TET-Exam
TET-Exam Sakal
महाराष्ट्र

TET 2018 Fraud: आत्तापर्यंतच्या तपासणीत 1778 जण अपात्रचे झाले पात्र

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) 2018 मधील परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराच्या आत्तापर्यंतच्या तपासामध्ये 1778 जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याचे चौकशीतुन पुढे आले आहे. तर याच गुन्ह्यात आणखी बारा आरोपी निष्पन्न झाले असून सायबर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

आरोग्य विभाग, म्हाडा पाठोपाठ सायबर पोलिसांनी 2019-20 च्या "टीईटी' परीक्षेतील गैरव्यवहार पुढे आणला होता. उमेदवारांकडून पैसे घेऊन परिक्षेच्या निकालामध्ये फेरफार करून काही जण अपात्र असतानाही त्यांना पात्र केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. त्यानुसार, पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा, महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व अन्य परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जी.ए.टेक्‍नॉलॉजी कंपनीचे अधिकारी, दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

दरम्यान, 2018 मध्येही याच प्रकारे गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यामध्येही गुन्हा दाखल करुन आत्तापर्यंत 8 आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये आणखी 12 आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे.2018 च्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत परीक्षेमध्ये एकूण 131 परीक्षार्थींची बनावट प्रमाणपत्रे, वरिष्ठांकडे प्राप्त अर्ज, व्हाटस्‌अपचॅटमधील प्राप्त बैठक क्रमांकानुसार पोलिसांच्या तपासामध्ये 82 जणांच्या निकालाची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी 213 अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले.

तर टीईटीच्या 12 सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या परीक्षेच्या मुळ निकालामध्ये 817 जणांचे गुण वाढविण्यात आल्याचे उघड झाले. त्या सर्वांची उत्तरपत्रिका उत्तरसुचीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. त्यासंबंधीचा मुळ निकाल त्याच दिवशी ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर संबंधित निकालामध्ये अपात्र असलेले आणखी 710 व 38 उमेदवारांचे गुण वाढवून त्यांची माहिती नंतर दोनदा संबंधीत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार, आत्तापर्यंत 1778 अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे आढळून आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस.हाके, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT