TET exam TET exam
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक : TET च्या 7800 अपात्र उमेदवारांना पैसै घेऊन केले पात्र

अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण परिषदेच्या आयुक्तापासून अनेकांचा गैरप्रकारात समावेश असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2020) प्रकरणात सात हजार ८०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. (Fraud In TET Exam)

२०१९-२० साली झालेल्या टीईटी परिक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या परिक्षेच्या निकालातील अंतिम १६ हजार ७०५ पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुरावा याचा एकत्रित तपास. तसेच परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण सात हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मुळ गुणांमध्ये वाढ करून त्यांना पात्र केल्याचे निष्पन्न झालेले आहे. या परीक्षार्थींची संख्या आणखी वाढ होवू शकते, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी (ता. २८) पत्रकारांशी बोलताना दिली.

या प्रकरणात शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह ३० ते ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुपे याच्याकडून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस अंमलदार सचिन वाझे, रवींद्र साळवी आणि तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलिस निरीक्षक कोळी व खेडेकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

अपात्र उमेदवारांची यादी शासनाकडे सादर करणार :

गुणवाढ करण्यात आलेल्या अपात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. अपात्रांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेण्यात आले आहे. अपात्रांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभाग तसेच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असे गुप्ता यांनी सांगितले.

याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत असून २०१९-२०२० मधील शिक्षक पात्रात परीक्षा राज्यातील १६ हजार ७०५ उमेदवारांनी दिली होती. त्या सर्व उमेदवारांची ओएमआर शीटची तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

-अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT