rajesh tope rajesh tope
महाराष्ट्र बातम्या

आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET; दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना मनस्ताप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. आरोग्य विभागीतल 'क' आणि 'ड' वर्गाच्या परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानकपणे रद्द करण्यात आल्या होत्या. या प्रकारच्या सावळ्या गोंधळावर विद्यार्थी वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच या परीक्षा रद्द करण्यात आल्याची सारवासारव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली होती आणि आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही या परीक्षांबाबतचा घोळ सुटता सुटत नाहीये. आता गट 'ड'ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.

नोकरीच्या शोधात असलेले अनेक पदवीधर आरोग्य विभागाच्या गट 'ड' परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच उमेदवाराने टीईटी परीक्षेसाठीही अर्ज केला आहे. आता त्यांच्यासमोर मोठी अडचण झालेली आहे की कोणती परीक्षा द्यायची? आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दुसरी कोणती परीक्षा आहे का याची चौकशी केली नसेल का? असा प्रश्न आता परीक्षार्थी विचारत आहेत. विशेष म्हणजे टीईटीची परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार होती. त्यादिवशी युपीएससीची असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती आणि ३१ ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आता राज्यभर घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी आता पुन्हा ही आरोग्य भरतीची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने पुन्हा एकदा राज्यशासनाचा सावळा गोंधळ संपतानाची चिन्हे दिसत नाहीयेत.

आरोग्य विभागाच्या नव्या तारखा

परीक्षेच्या एक दिवस आधी पुढे ढकलण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि गट 'ड' च्या परीक्षांची नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गट 'क' ची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी तर गट 'ड'ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या परीक्षांच्या नऊ दिवस आधी उमेदवारांना हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. परीक्षांसदर्भात आज पार पडलेल्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT