Tukaram Supe sakal media
महाराष्ट्र बातम्या

तुकाराम सुपे अखेर निलंबित; वर्षा गायकवाड यांची माहिती

संजीव भागवत

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam scam ) गैरकारभार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe suspended) यांना शिक्षण विभागाने (Education Board) निलंबित केले आहे. यासाठी आज त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुपे यांचे हे निलंबन त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाने सुपे यांच्या निलंबनाचा काढलेला हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपे यांच्याकडे लाखो रुपयांची रोकड आणि टीईटी परीक्षेसंदर्भातील अनेक कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६.डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Amazon Container Accident: चालकाला डुलकी लागल्याने ॲमेझॉनचा कंटेनर महामार्गावरील खड्ड्यात पलटी; मोठे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

Marathi Live Updates News: वारजेतील वडापाव सेंटरसह हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik Rail Protest: पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठी ९ ऑगस्टला आळेफाट्यावर चक्काजाम; पक्षनिरपेक्ष जनआंदोलनाची हाक

SCROLL FOR NEXT