Pravin Darekar Abdul Sattar Sakal
महाराष्ट्र बातम्या

TET घोटाळ्यात सत्तारांचा समावेश?; प्रवीण दरेकर म्हणाले "हा शिक्षण क्षेत्राला कलंक"

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यात गाजलेल्या TET घोटाळ्यात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून ट्वीट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Pravin Darekar On Abdul Sattar)

"टीईटी घोटाळ्याच्या संदर्भात विधानपरिषदेत मी आणि तात्कालीन विरोधीपक्षनेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. या प्रकरणात या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम्ही त्यावेळी केला होता. पण आता एक विदारक सत्य बाहेर आलं असून शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा यामध्ये सामावेश असल्याचं समोर आलं आहे." असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

टीईटी घोटाळा हा शिक्षण क्षेत्रातला मोठा कलंक आहे, मात्र अब्दुल सत्तारांनी सुद्धा आव्हान दिलंय की माझ्या मुलांचा यामध्ये सामावेश असेल तर मी कोणत्याही शिक्षेस तयार आहे. त्यामुळे काही काळात सत्य समोर येईलंच. या टीईटी घोटाळ्याचं खरं सत्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येण्याची गरज असून या निमित्ताने ते बाहेर येईल अशी अपेक्षा भाजपचे नेते प्रविण दरेकरांना व्यक्त केली आहे.

दरम्यान, परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.

हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून 2020 मध्ये त्या अपात्र आहेत सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार गटाची गुप्त बैठक; पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये चर्चा, अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात?

Tech Tips : गाडी चालवताना येतो कटकट आवाज? लगेच चेक करून घ्या 'हा' पार्ट , नाहीतर होऊ शकतो मोठा अपघात

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना फटका; पाहा लोकलचं वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : मुक्ताई माता मंदिरातील चोरी उघड; टोळीतील तिघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लखनौकडून चेन्नईचा धुव्वा! ऋतुराज गायकवाडने पराभवानंतर मान्य केली मोठी चूक, म्हणाला आम्ही...

SCROLL FOR NEXT