TET exam news esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! २८ जूनला ‘टीईटी’, राज्यातील सव्वादोन लाख शिक्षक देणार परीक्षा; उत्तीर्ण होण्यासाठी ५५ ते ६० टक्के गुणांची अट, वाचा...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना (सेवानिवृत्तीला पाच वर्षे कमी असलेले वगळून सगळेच) ऑगस्ट २०२८ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर २८ जूनला होणाऱ्या ‘टीईटी’साठी राज्यातील दोन लाख २६ हजार ४६३ शिक्षकांनी अर्ज केल्याची बाब समोर आली आहे. ‘टीईटी’च्या पेपर एक व पेपर दोनसाठी नोकरीतील शिक्षकांचे एकूण तीन लाख ४६ हजार अर्ज आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना (सेवानिवृत्तीला पाच वर्षे कमी असलेले वगळून सगळेच) ऑगस्ट २०२८ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर २८ जूनला होणाऱ्या ‘टीईटी’साठी राज्यातील दोन लाख २६ हजार ४६३ शिक्षकांनी अर्ज केल्याची बाब समोर आली आहे. ‘टीईटी’च्या पेपर एक व पेपर दोनसाठी नोकरीतील शिक्षकांचे एकूण तीन लाख ४६ हजार अर्ज आहेत.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांवरील शिक्षकांना ‘टीईटी’चा पेपर-एक, तर सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना पेपर-दोन द्यावा लागतो. काही शिक्षक तिसरी- चौथीपासून सहावी- सातवीच्या वर्गांवर नियुक्त आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांना दोन्ही पेपर उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही पेपरसाठी अर्ज केले आहेत.

‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांपैकी ६० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. तर मागासवर्गातील उमेदवारांसाठी ५५ टक्के आणि माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नींना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुणांची अट आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीपर्यंत शिक्षकांना परीक्षेच्या एकूण १० संधी मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई होणार आहे. त्यामुळे ५०, ५२, ५३ वयाचे शिक्षक देखील आता परीक्षेचा अभ्यास करीत आहेत.

प्रत्येक वर्गखोलीत असणार सीसीटीव्ही

शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) संपूर्ण तयारी झाली आहे. यंदा ‘टीईटी’साठी सुमारे सहा लाख अर्ज प्राप्त झाले असून १७२९ केंद्रांवर त्यांची २८ जूनला परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेसाठी साडेचौदा हजार वर्गखोल्या असून, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

शिक्षकांना ‘टीईटी’साठी वरिष्ठांच्या परवानगीचे बंधन नाही

नोकरीतील शिक्षकांना यापूर्वी ‘टीईटी’ देण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाची मान्यता घेणे बंधनकारक होते. मात्र, नियुक्त शिक्षक पात्रतेची परीक्षा देत असल्याने त्यांना आता वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली. जिल्ह्यातील २८ हजार उमेदवारांनी २८ जूनच्या ‘टीईटी’साठी अर्ज केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tandulwadi Accident : 15 जूनला शाळा सुरू होणार म्हणून लाडक्या बहिणींना देवदर्शनाला नेलं, पण..; MSRDC च्या 'त्या' एका दुर्लक्षामुळं 8 जणांचा गेला नाहक बळी!

खासदारकीसाठी TMC बंडखोरांनी निवडला त्रिपुरातला लहान पक्ष, फक्त नावाला अस्तित्वात; दोन वर्षांपूर्वी NCPIची स्थापना

Pune Ring Road: पुणे परिसरातील ११७ गावांसाठी मोठी बातमी! सरकारच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा, रिंगरोडलाही मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Nagpur: मांजर चावल्यानं तक्रारीला उशीर, विनयभंगाचा गुन्हा कोर्टानं केला रद्द; शाळेच्या अध्यक्षाला दिलासा

SCROLL FOR NEXT