TET Promotion Rules Maharashtra

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

‘टीईटी’ रविवारी! २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना ‘टीईटी’साठी नो एंट्री; ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत आणण्याचे बंधन, वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील ४७ केंद्रांवर रविवारी (ता. २८) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. पेपर देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकास पेपर सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे आधी केंद्रावर पोचणे बंधनकारक असणार आहे. पेपर-एक सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल. पेपर-दोनची वेळ दुपारी अडीच ते सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ४७ केंद्रांवर रविवारी (ता. २८) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. पेपर देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकास पेपर सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे आधी केंद्रावर पोचणे बंधनकारक असणार आहे. पेपर-एक सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल. पेपर-दोनची वेळ दुपारी अडीच ते सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २८ हजार २९८ उमेदवारांनी ‘टीईटी’साठी अर्ज केले आहेत. ‘टीईटी’चा पेपर-एक हा इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी आणि पेपर-दोन हा इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी आहे. एखादा शिक्षक दोन्ही पेपर देऊ शकतो. पेपर सुरू होण्यापूर्वी दोन तास आधी परीक्षार्थींना केंद्रांवर बोलाविण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षार्थीचा चेहरा, बोटांचे ठसे इलेक्ट्रिक उपकरणांद्वारे तपासले जाणार आहेत. अर्ज केलेलाच उमेदवार परीक्षा द्यायला आला आहे का, याची खात्री त्यावेळी केली जाणार आहे. याशिवाय मेटल डिटेक्टरद्वारे प्रत्येकाची तपासणी होणार आहे. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर प्रत्येक उमेदवाराचा चेहरा स्पष्टपणे दिसायला हवा.

परीक्षेतील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात देखील स्वतंत्र नियंत्रण कक्ष असणार आहे. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू झाला असून अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. काही शहरांमध्ये आंदोलने, मोर्चे असू शकतात. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर वेळेत पोचणे आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

परीक्षचे नियोजन झाले, सीसीटीव्हीद्वारे हालचालींवर नजर

येत्या रविवारी (२८ जून) शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून, नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून परीक्षेतील प्रत्येक हालचालींवर आमचे लक्ष असणार आहे. परीक्षार्थींना पेपर सुरू व्हायला २० मिनिटे कमी असेपर्यंत प्रवेश मिळेल, त्यानंंतर एकालाही केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्राचे बंधन

‘टीईटी’साठी प्रत्येक परीक्षार्थीकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, स्मार्ट कार्ड, पासपोर्ट यापैकी एक ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. झेरॉक्स नव्हे तर ते ओरिजनल असावे, अशी अट आहे. याशिवाय परीक्षार्थीस बूट (शूज) घालता येणार नाही. पारदर्शक पाणी बाटली घेऊन यायला परवानगी असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ‘टीईटी’ची स्थिती

  • एकूण अर्जदार

  • २८,२९८

  • ‘पेपर-एक’चे परीक्षार्थी

  • १२,२६१

  • ‘पेपर-दोन’चे परीक्षार्थी

  • १६,०३७

  • पेपरसाठी वेळ

  • २.३० तास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT