TET 2025 Sakal
महाराष्ट्र बातम्या

‘टीईटी’चा १७ जानेवारीपूर्वी निकाल! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी; जूनअखेर पुढची शिक्षक पात्रता परीक्षा

२३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या ‘टीईटी’चा निकाल पुढील आठ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन आहे. उत्तरसूचीवर प्राप्त पाच हजार हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील ‘टीईटी’ जूनअखेर घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल १६ जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरु आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिका व खासगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता आता अंतिम झाली आहे. त्यात पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेली पदे व मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या भरतीत आता ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही सहभागी होता येणार आहे.

दरम्यान, परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीवर पाच हजार आक्षेप तथा हरकती नोंदविल्या होत्या. त्याचा निपटारा करून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेकडून केली जात आहे. ‘टीईटी’ची बनावट प्रमाणपत्रे, गुण वाढवून देण्याचे गैरप्रकार यापूर्वी झाल्याने आता नियुक्ती संस्थेने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेकडून केली जाते. दोन-तीन दिवसांत ही पडताळणी पूर्ण होईल आणि आठ दिवसांत निकाल जाहीर होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिक्षक करताहेत ‘टीईटी’चा अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षकांना (सेवानिवृत्तीस पाच वर्षे शिल्लक असलेले वगळून) दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. सप्टेंबर २०२७ पर्यंत ही मुदत आहे. या काळात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तीन ‘टीईटी’ घेतल्या जाणार आहेत. आता जूनअखेर ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना यंदाच्या उन्हाळा सुटीत ‘टीईटी’चाच अभ्यास करावा लागणार आहे. अनेकांनी आतापासूनच अभ्यास सुरु केला आहे.

पुढील ‘टीईटी’चेही नियोजन

२३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या ‘टीईटी’चा निकाल पुढील आठ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन आहे. उत्तरसूचीवर प्राप्त पाच हजार हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील ‘टीईटी’ जूनअखेर घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT