Thackeray faction Kapil Sibal shivsena symbol hearing today to election commission Maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Symbol Hearing : …तर आयोगाचा निर्णय हास्यास्पद ठरेल; सिब्बल यांनी मांडला महत्वाचा मुद्दा

सकाळ डिजिटल टीम

Shiv Sena Symbol Hearing : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सध्या युक्तीवाद सुरू आहे. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळेल यावरून वाद सुरू आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या दरम्यान शिवसेना कोणाची याबद्दल सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही सुनावणी घेऊ नये अशा मागणी ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत झालेल्या फुटी पडली. यानंतर महाराष्ट्रात तयार झालेल्या राजकीय संकटाशी संबंधित याचिकांवर १४ फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय देईपर्यंत केंद्रीय निवडणुक आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी मागणी केली आहे, यासोबतच त्यांनी सुप्रिम कोर्टाने जर अपात्र ठरवलं तर निवडणूक आयोगाचा निर्णय हास्यास्पद ठरेल असेही सिब्बल म्हणाले आहेत. दरम्यान अद्याप अपात्र ठरवले नसल्याने धनुष्यबाणाचा निर्णय शक्य असल्याचा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात पार पडली. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

आता ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत कोणता निर्णय होऊ शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT