Tanaji Sawant Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : "सावंत बंधूंनी लाखाची सभा घेऊन दाखवावी, तर राजकीय संन्यास घेऊ"

पंढरपुरात एक लाखाच्या पुढे सभा घेऊन दाखवल्यास मी राजकीय संन्यास घेईन

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत व त्यांच्या बंधूंनी कधीही यापुढे पंढरपुरात एक लाखाच्या पुढे सभा घेऊन दाखवल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी आज मंत्री सावंत यांना दिले आहे.

उद्धव ठाकरे यांची २४ डिसेंबर २०१८ ला पंढरपुरात ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ सभा पार पडली होती. या सभेस राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व शिवसेना समर्थक पंढरपुरात लाखोंच्या संख्येने आले होते.

ही सभा ऐतिहासिक गर्दीची झाली होती. मात्र या सभेच्या गर्दीबाबत काल पंढरपुरात एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ‘माझ्यामुळे सात लाखांचा मेळावा झाला होता’, असे खळबळजनक विधान केले आहे.

त्यांच्या या विधानाचा आता पंढरपुरातच ठाकरे सर्मथक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला असून, सावंत बंधूंनी आधी आपले होम ग्राउंड असलेल्या माढा तालुक्यात पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन दाखवावे, तसेच पंढरपुरात सावंत बंधूंनी त्यांच्या नावावर एक लाखाची सभा घेऊन दाखवावी, आम्ही राजकीय संन्यास घेऊ, असे खुले आव्हान श्री. शिंदे यांनी दिले आहे. सावंत ठाकरे गटाचे आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संभाजी शिंदे म्हणाले, वाचाळवीर आरोग्यमंत्री सावंतांनी पंढरपुरातील उद्धव ठाकरेंच्या सभेबाबत जे विधान केले, ते केवळ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी केले आहे. त्या सभेसाठी राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने आले होते. असे असताना सात लाखांची गर्दी आमच्यामुळे झाली, असे म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे.

ज्या ‘मातोश्री’मुळे आपण मोठे झाला आहात, त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची पाहावी, अशी टीका तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT