Thackeray Group MP 
महाराष्ट्र बातम्या

Thackeray Group MP: ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या, शिंदे गट खासदारांवर करणार कायदेशीर कारवाई

Sandip Kapde

Thackeray Group MP:   लोकसभेत अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप पाठवला होता. मात्र ठाकरे गटाचे ५ खासदार अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

सोमवारी वकिलांशी चर्चा करून ठाकरे गटाच्या खासदारांना कायदेशीर नोटीस देणार आहोत. लोकसभेत शिवसेनेचा एकच गट मानला जातो. त्यामुळे व्हीप भावना गवळी यांचाच लागू होतो, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

काल गुरुवार अविश्वास ठरावावर मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी देखील वॉक आउट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.

शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्टीकरण दिले. शेवाळे म्हणाले, अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळं यावर चर्चा होण्याचा प्रश्न नाही.  (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT