Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं! शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी 31 ऑक्टोबरला होणार होती, ती पुन्हा लांबणीवर पडली आहे. निवडणूक बॉण्डबाबत 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी बंड केलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा (ठाकरे आणि शिंदे) युक्तीवाद ऐकला, व त्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यासंदर्भात 31 ऑक्टोबरला पार पडणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी 31 ऑक्टोबरला होणार होती, ती पुन्हा लांबणीवर पडली आहे. निवडणूक बॉण्डबाबत 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ४० आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाला, असा वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरु होता. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हं आणि पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.

निवडणूक आयोगाने कशाच्या आधावर शिंदे गटाला दिलं पक्षचिन्ह आणि नाव

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे पक्षचिन्ह आणि नाव देत असताना विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली. या आकडेवारीनुसारच आयोगाने शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि नाव दिलं होतं.

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना 23.5% मते मिळाली आहे. त्यामुळे मतांची तसेच विधीमंडळातील आकडेवारी पाहता, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाचाच अधिकार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT