Eknath Shinde and Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde: संजय राऊतांना हटविण्याची प्रक्रिया सुरू; शेवाळेंनी स्पष्टचं सांगितलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संघर्षावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. सत्तासंघर्षावरील सुनावणी याचं आठवड्यात संपणार आहे. अशी माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ८ महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी संवाल साधला.

राहुल शेवाळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने जो शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. त्यानुसार आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदे आहेत. राज्यसभेचे गटनेते आता संजय राऊत आहे. मात्र यापुढे संसदेचा गटनेता ठरविण्याचा अधिकार आता शिंदे यांनाच आहे. त्यानुसार संसदीय कार्यमत्र्यांना संसदेचा गटनेता म्हणून गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्याचं पत्र दिल्याची माहिती शेवाळे यांनी दिली.

राज्यसभेत तुमचे तीन खासदार आहेत. त्यात संजय राऊत यांचाही समावेश आहे. त्यांनाही शिवसेनेचा व्हिप मान्य करणे अनिवार्य असल्याचं शेवाळे यांनी नमूद केलं. मात्र आता लगेच संसदेच्या अधिवेशनात व्हिप देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र गटनेतेपदावरून संजय राऊत यांना हटविण्याची प्रक्रिया शिवसेनेकडून सुरू करण्यात आली हे त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांनी जो फ्लोअर टेस्टचा निर्णय़ घेतला, त्याबाबत सर्वोच्च न्यायालायाची वेगळी भूमिका होती. परंतु विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे होते. नेता म्हणूनच त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं होतं. विधीमंडळ नेता म्हणूनच आमदारांनी शिंदेंवर दबाव आणला होता. म्हणून गटनेता त्यांनी राज्यपालांना पत्र पाठवल्याचं शेवाळे यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

Pune Bar Election : पुणे बार निवडणुकीत साडेसात हजार वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यवस्थापनावर नाराजी

Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT