Uddhav-and-Bhagatsing 
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंची नियुक्ती राज्यपालांना बंधनकारक

प्रशांत बारसिंग

मुंबई - उत्तर प्रदेशातील १९६१ मधील खटला आणि घटनेतील तरतुदींनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार करणे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना बंधनकारक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अनिश्चिततेचे सावट असल्याची चर्चा निरर्थक ठरणार आहे.

२७ मे २०२० पूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे मुख्यमंत्री ठाकरे यांना बंधनकारक आहे. सध्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त असून त्यातील एका जागेवर ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस मंत्रिमंडळाने केली आहे. मात्र राज्यपालांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राज्यपाल कोट्यातून घटनात्मकदृष्ट्या ठाकरे आमदार होऊ शकत नाहीत, असे काही दिवसांआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याच तांत्रिक गोष्टीवर पाटील आणि भाजपची मदार अवलंबून असल्याची चर्चा आहे.

अनिश्चिततेची चर्चा निरर्थक
ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस ६ एप्रिलला राज्यपालांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल आता यावर कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. याआधी मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या २ नियुक्त्या राज्यपालांनी फेटाळल्या आहेत. या फेटाळलेल्या २ जागांपैकी एका जागेवर ठाकरेंची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जरी नेमणूक केली तरी ती मूळ सदस्याच्या कालावधीपुरतीच असेल. त्यामुळे सर्व १२ सदस्यांची एकाच वेळी म्हणजे जून २०२० मध्ये नियुक्ती व्हावी, असे राज्यपालांचे मत असल्याची माहिती आहे. 

असे झाले तर ठाकरे मुख्यमंत्री होऊन सहा महिने पूर्ण झाल्यावर त्यांचे पद आपोआप संपुष्टात येऊन सरकार पडेल, अशी विरोधी गोटात चर्चा आहे. परंतु, राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी घटनेतील तरतुदी आणि १९६१ मधील उत्तर प्रदेशातील खटल्याचा निकाल पाहता ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती होण्यात अडचण नसल्याचे घटनातज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरेंच्या जमेच्या बाजू

  • राज्यपालांकडे राज्याचे पालकत्व असते. त्यामुळे मंत्रिमंडळाने केलेली शिफारस त्यांना बंधनकारक आहे.
  • उद्धव ठाकरे फक्त राजकीय व्यक्तिमत्त्व नसून ते सामाजिक कार्यकर्ते, छायाचित्रकार म्हणून कलावंत, ‘सामाना’चे माजी कार्यकारी संपादक म्हणून पत्रकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT