Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: 'अमित शाहांनी सारखं-सारखं अप-डाऊन करू नये, त्यांनी…',मुंबई दौऱ्यावरून अंधारेंची खोचक टीका!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेल्या काही दिवसांपासून वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याचे दिसून येत आहेत. आज ते पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विलेपार्लेमध्ये पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा १०० वा भाग ऐकतील. ते त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावरून शिवसेना(ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाह यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

“अमित शाह यांनी दिल्ली ते मुंबई येणं-जाणं करण्यापेक्षा मुंबईमध्येच एखादा दोन बीएचके फ्लॅट घेऊन टाकावा. एका रुममध्ये त्यांनी राहावं आणि दुसऱ्या रुममध्ये पंतप्रधान मोदी यांनी राहावं. सारखं सारखं अप-डाऊन करू नये. मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीसाठी इतक्या फेऱ्या मारण्याची गरज नाही”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुढे बोतलाना त्यांनी मुंबई महापालिका कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर विश्वास ठेवत आली आहे. यापुढेही मुंबई महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खोपोलीतील शिवप्रबोधन यात्रेनंतर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी संपुर्ण राणे परिवाराला लक्ष केलं आहे. राणेंची दोन्ही मुलं विद्वान आहेत. त्यांच्याबद्दल आपण बोलू नये, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. काल माध्यमांशी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला होता. उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र रचत होते, असं ते म्हणाले होते. यावरून सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढणार

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

Rohit Sharma च्या मनातलं नाव जादुगारानं एकदम करेक्ट ओळखलं, हिटमॅनही झाला आवाक्; Video Viral

SCROLL FOR NEXT