Kirit Somaiya Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya: "फडणवीसजी सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का?"

आज अधिवेशनाच्या दुसऱ्यादिवशी विरोधक या व्हिडिओवरुन आक्रमक झालेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

Kirit Somaiya Viral Video Case: भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या आणि भाजपा नेते या व्हिडिओमुळे अडचणीत आलेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या कथित व्हि़डिओवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या व्हिडिओ प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. तर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट फडणवीसांना प्रश्न केला आहे.(Latest Marathi News)

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी किरीट सोमय्या यांच्या विषयावरुन देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

'किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, असं देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. किरीट सोमय्या सातत्याने ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करत होते. याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची देखील चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे', असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.(Latest Marathi News)

पुढे भास्कर जाधव म्हणाले कि, 'धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा शर्मा, पूजा चव्हाण यांना न्याय मिळाला नाही. उलट संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं. राहुल शेवाळे यांच्याबाबतीतही महिलेला न्याय मिळाला नाही. त्यामुळे भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्याय मिळेल असं वाटत नाही, फडणवीस सोमय्याला क्लीन चीट देणार का?' असंही जाधव म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर 'लोकांना तत्वज्ञान सांगायच, लोकांना नैतिकतेच धडे द्यायचे, अशी भाजपाच्या बाबतीत अनेक उदहारण आहेत' असा खोचक टोला जाधव यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादांच्या निधनानंतर निधीची जुळवाजुळव करताना CM फडणवीसांची दमछाक; शासकीय खर्चासाठी आता नवी नियमावली

अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या गप्पा, पण पायाभूत सुविधा कुठे?” ; Mumbai–Pune Expressway वरील ट्रॅफिकमुळे युवती संतप्त

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

World Cancer Day 2026: मधुमेह, लठ्ठपणामुळेही कर्करोगाचा धोका! तज्ज्ञांचा इशारा; जागतिक कर्करोग दिनानिमित्त लवकर निदानावर भर

New Cricket Laws : विकेट घेतली, तरी ओव्हर पूर्ण करावीच लागणार; MCC कडून नवे क्रिकेट नियम जाहीर; एकूण ७३ नियमांमध्ये केला बदल

SCROLL FOR NEXT