Karnataka Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Karnataka Election: 'राहुल गांधी सर्वांचे बाप...', सुषमा अंधारेंनी चोळलं भाजपच्या जखमेवर मिठ

'पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट मे आ गया', सुषमा अंधारेंची काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता काँग्रेसला 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधींचे कौतुक केलं आहे. सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले होते. नरेंद्र मोदी यांनी 19 सभा रोड शो केले होते. त्याचबरोबर अनेक केंद्रीय मंत्री यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते कर्नाटकात प्रचारासाठी आले होते. मात्र भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे.

सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या की, 'महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. कर्नाटकचे निकाल हे एकूणच 'मोदी है तो मुनकीन है' असे म्हणणाऱ्या सगळ्या भक्तजनांसाठी ही चपराक आहे. पण असं म्हटल्यावर ज्यांची उमेद जात होती त्या सर्वांसाठी हा ऊर्जादायी निकाल आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रचंड नकारात्मक राजकारण अन् ऊर्जा निर्माण केली होती. त्याला सगळे कंटाळले आहेत. कर्नाटक मधील निकालाची विजयाची ऊर्जा हे महाराष्ट्रात दिसेल असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

तर पुढे त्या म्हणाल्या की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकात दिसणार नाही असं म्हटलं जात होतं. ज्या राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेल ने पप्पू म्हणून हिणवलं ते राहुल गांधी हे सर्वांचे बाप निघाले. राहुल गांधी यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधीच काय तर नेहरू गांधी यांना देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 'पप्पू पास नही हो गया पप्पू मेरिट मे आ गया', असंही अंधारे म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT