Thane court grants bail to Ketki Chitale Thane court grants bail to Ketki Chitale
महाराष्ट्र बातम्या

मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिला बुधवारी (ता. २२) ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर (Grants bail) केला आहे. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केले होते. यामुळे तिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. तिच्या या वक्तव्याच्या सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात आला होता. (Thane court grants bail to Ketki Chitale)

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शरद पवार (sharad pawar) यांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केले होते. तसेच त्यांना भ्रष्ट संबोधले होते. यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. वाढता वाद पाहून केतकी चितळे हिला अटक करण्यात आली होती.

आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर केतकीला १४ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर १८ मे पासून केतकी न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएम पटवर्धन यांनी सुनावणी केली.

गुन्हे शाखेने आधीच जामीन अर्जाला विरोध करीत उत्तर दाखल केले होते. मंगळवारी केतकीच्या जामीन अर्जाला पोलिस विरोध करीत नसल्याचे सांगत अतिरिक्त जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार बुधवारी न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.

केतकी चितळेवर (Ketki Chitale) झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वकिलांनी राज्यपालांकडे केली होती. पोस्टाद्वारे गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाने सल्ला दिला आहे. याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीने याचिकेतून केला होता. आता केतकी चितळेला जामीन मंजूर (Grants bail) झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT