thane court orders not to arrest Jitendra Awhad till 11 am tomorrow maharashtra news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: आव्हाडांना अटकेपासून दिलासा! ठाणे कोर्टाने दिले महत्वाचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

ठाणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे, दरम्यान या प्रकरणात ठाणे कार्टाने दिलासा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत अटक न करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे.

आव्हाडांना उद्या सकाळी ११ पर्यंत अटक न करण्याचे आदेश ठाणे कोर्टाने मुंब्रा पोलिसांना दिले आहेत. उद्या या प्रकरणात ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे, तोपर्यंत आव्हाडांना अटक करु नये असे आदेश कोर्टाने दिलेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या कार्यक्रमात एका महिलेला धक्का देऊन दूर केल्यामुळे ठाण्यातील मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. यासाठी त्यांनी ठाण्यातील एका मॉलमध्ये घुसून चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यांनतर आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केल्यानंतर त्यांच्यावर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT