Jalgaon News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Thane Crime News : इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुलीने घरी येऊन घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एका १५ वर्षीय मुलीवर एका अल्पवयीन मुलासह चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेची काही दिवसांपूर्वीच एका आरोपीशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती.

साहिल राजभर, सुजल गवळी, विजय बेरा अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार, उल्हासनगर इथला साहिल याच्याशी सोशल मीडियावरून पीडितेची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघे भेटले. पुढे साहिलने तिला मेसेज केला की, आपल्या गर्लफ्रेंडचा पीडित मुलीमुळे काही गैरसमज झाला आहे आणि त्याने पीडितेला आपल्या घरी येऊन प्रकरण मिटवण्यास सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर पीडित मुलगी साहिलच्या घरी पोहोचली, जिथे तिच्यावर बलात्कार झाला असा आरोप आहे. घाबरून पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. साहिलने पीडितेला पुन्हा बोलावलं आणि दुसऱ्या दिवशीही त्याच्या तीन मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला. मुलगी परत घरी आली आणि तिच्या कुटुंबीयांना सामूहिक बलात्काराची माहिती दिली. या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT