Kirit Somaiya Kirit Somaiya
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya l शेवटी ठाकरे सरकारने करून दाखवलं; सोमय्यांचा निशाणा

वडाळा घाटकोपर मुलुंड या मेट्रोचे देखील काम बंद आहे.

सकाळ डिजिटल टीम

ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प आहे. त्यातच आता वडाळा- घाटकोपर- मुलुंड या मेट्रोचे देखील काम बंद आहे. दोन कंत्राटदारांच्या आडमुठेपणाचा फटका मेट्रो प्रकल्पाला बसला आहे. काही ठिकाणी लावलेल्या बॅरिकेट्समुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे रहिवाशांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) ट्विट करत निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिका (BMC) निवडणुक तोंडावर असतानाच अनेक घटना-घडामोडींना उधान आले आहे. याआधी आयकर विभागाने शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav Income Tax Raid) यांच्या घरावर छापेमारी केली होती. पुन्हा आता मेट्रो प्रकल्पाचा मुद्दा समोर आला आहे.

मुंबईत मेट्रोची चौथी लाईन सुरू करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच आता कारशेडसाठी जागा आवश्यक असून ती अद्याप न मिळाल्याने काम किचकट झाले आहे. यामुळे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यास दिरंगाई होत आहे. यावरून किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवरवर निशाणा साधला आहे. त्यातच आता वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे मेट्रोसाठी कारशेड विकसित केलेले नाही. ASTOM कंपनीने महाराष्ट्र सरकारला कळवले आहे की ते वडाळा ठाणे मेट्रोसाठी २३४ कार बनवणार नाहीत. यावरून सोमय्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) घणाघात केला आहे.

ट्विट करत सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकार आरे कार शेड/डेपो चे काम थांबविले. त्यानंतर मुंबई मेट्रो रुळावरून खाली आणली. कुलाबा, मरोळ सिपझ/आरे मेट्रो बंद पडली. आत्ता वडाळा- घाटकोपर-मुलुंड ठाणे मेट्रोचे काम बंद केले. शेवटी ठाकरे सरकार नी जे करायचे ते करून दाखवले अशी टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील प्रस्तावित कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय़ याआधी घेतला होता. यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे आग्रही होते. आरे मधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील भुमापनाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. तिथे तयार झालेल्या मेट्रो भवन इमारतीचे काय करणार याची ही चर्चा ठाकरे यांनी केली होती. दरम्यान आज ASTOM कंपनीने मेट्रोसाठी कार बनवण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT