महाराष्ट्र बातम्या

Thane Politics: शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांच्या आमदारकीची चर्चा

डोंबिवलीत वाढदिवसानिमित्त लागले भावी आमदारकीचे बॅनर | Banners of future MLAs were put up on the occasion of birthdays in Dombivli

शर्मिला वाळुंज

शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर वर मात्रे यांचा भावी आमदार असा उल्लेख करत त्यांना शिवसैनिकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

डोंबिवली विधानसभा क्षेत्र हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जाण्याची शक्यता असून म्हात्रे यांचे नाव चर्चेत आहे. याआधी ही म्हात्रे यांनी मतदारसंघातून आमदारकी लढवली असल्याने एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा 4 मार्चला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवस आधीपासूनच शहरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

या बॅनरवर दीपेश म्हात्रे यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सत्ताधारी पक्षाकडून विकास कामाचे लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमांचे धुमधडाक्यात आयोजन करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील ही सर्व तयारी शहरात सुरू असताना इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. तर कार्यकर्ते देखील आपल्या नेत्यांची प्रसिद्धी जोरात करत असल्याचे दिसुन येत आहे.

म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरमुळे अशीच चर्चा सुरू झाली आहे. म्हात्रे यांचा रविवारी वाढदिवस असला तरी शुक्रवारी रात्रीच हे बॅनर शहरात झळकविण्यात आले आहेत.

शनिवारी कल्याण लोकसभा क्षेत्रात विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम तसेच शासन आपल्या दारी या कार्यक्रर्माचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे एक दोन दिवस आधीच कार्यकर्त्यांनी हे बॅनर झळकवत पक्षातील वरिष्ठांना एक संदेश देऊ केला आहे असे बोलले जात आहे.

डोंबिवली विधानसभा क्षेत्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे. 2009 पासून येथे भाजपची पकड राहिली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती नसल्याने शिवसेना पक्ष भाजप विरोधात उभा राहिला होता. त्यावेळी विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचा पराभव करून विजय मिळवला होता.

डोंबिवली विधानसभा क्षेत्रात सुमारे तीन लाखाच्या वर मतदार आहेत. यामध्ये ब्राह्मण, आगरी, कोकणी, दक्षिण भारतीय, गुजराती, जैन, उत्तर भारतीय, केरळ, कर्नाटक अशा विविध ठिकाणच्या मतदारांचा समावेश आहे.

राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती असली तरी जागा वाटपावरून कल्याण लोकसभा क्षेत्रात भाजप आणि शिवसेना गटात चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपचा दावा केला जात असताना डोंबिवली विधानसभा क्षेत्रासाठी शिवसेना दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्गची जबाबदारी दिल्यास डोंबिवली विधानसभा मतदार संघावर शिवसेना ताबा घेईल अशी शक्यता आहे. या विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाकडून दीपेश म्हात्रे व राजेश मोरे यांचे नाव आघाडीवर आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेना यांच्यात युती असली तरी डोंबिवली विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे दीपेश म्हात्रे व भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे सूत फारसे कधी जुळले नाही. विकास कामांवरून म्हात्रे यांनी चव्हाण यांना कायम लक्ष केल्याचे दिसून आले आहे.

त्यासोबतच दीपेश म्हात्रे यांनी आपल्या क्षेत्रात विकास कामांचा धुमधडाका देखील सुरू ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण देखील आता होत आहे. यामुळे शिवसेना या मतदारसंघात आपली पकड मजबूत करत आहे. भविष्यात यावर दावा ठोकण्याची शक्यता असून त्याची चर्चा जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT