Thane Rain Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Thane Rain Updates : ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचं थैमान; वाहतूक व्यवस्था ठप्प

संतोष कानडे

ठाणेः ठाणे शहर आणि परिसरामध्ये आज पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून रस्ते वाहतूक व्यवस्था आणि लोकल ट्रेन यंत्रणा कोलमडल्याचं चित्र बघायला मिळत आहे. संभाव्य पावसाचा धोका ओळखून ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्याबाबतचे आदेश ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यानुसार उद्या दि. २८ जून २०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशत १ ली ते १२वीच्या सर्व माध्यमांच्या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. ठाणे आणि परिसरामध्ये उद्यादेखील मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

मागच्या सहा तासांमध्ये ठाणे आणि परिसरात ७० मीमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. पंधरा ते वीस मिनिटं ट्रेन उशिराने धावत आहेत. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी दिसून येतेय. प्लॅटफॉर्मवर गर्दी असल्याने काही नागरिक रस्त्यावर येत बसची वाट बघत आहेत. बसही फुल होत असल्याने तारांबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT