Ketaki Chitale Sharad Pawar Controversy Sakal
महाराष्ट्र बातम्या

केतकीला पवारांवरील टीका भोवली! न्यायालयानं सुनावली कोठडी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Ketaki Chitale Sharad Pawar Controversy) वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यानंतर तिच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ठाणे पोलिसांनी अटक (Ketaki Chitale Arrested) केली असून आज ठाणे न्यायालयात हजर केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने केतकीला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी (Ketaki Chitale Police Custody) सुनावली आहे.

वकील नितीन भावे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकी चितळेने सोशल मीडियावरून शेअर केल्या होत्या. तिने अत्यंत खालच्या पातळीवर पवारांवर टीका केली आहे. पवार ब्राह्मणांच्या विरोधात असल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी केतकीला अटक केली.

केतकीवर अंडी आणि शाईफेक -

केतकीला अटक करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आधीच ठाणे पोलिस ठाण्यासमोर जमले होते. कार्यकर्त्यांनी कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर तिच्यावर अंडी आणि शाईफेक केली. तसेच तिच्याविरोधात घोषणाबाजी केली. केतकीला आज न्यायालयात हजर केले आहे. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे. कारण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे न्यायालयाबाहेर निदर्शने सुरू आहेत. केतकीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.

आतापर्यंत कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल? -

केतकीने शरद पवारांवर केलेल्या टीकेचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले आहे. आतापर्यंत तिच्यावर १० पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरगाव इथं गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आज मुंबईतील पवई पोलिस ठाणे आणि अमरावतीत गाडगे नगर पोलिस ठाणे, नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

TRAI SMS Codes : SMS च्या शेवटी P, G, T, S अक्षरांचा अर्थ काय? आत्ताच समजून घ्या नाहीतर होईल हजारो रुपायांची फसवणूक

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Parbhani News: परभणीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; डेपोतील प्रक्रिया कधी बंद तर कधी सुरू

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT