solapur-pune highway

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ‘जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल’ स्थापन केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक महामार्गालगतच्या व्यावसायिक बांधकामांची माहिती मागविली असून, शहर हद्दीतून गेलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूस देखील जेवढ्या मीटरचा रस्ता तेवढे अंतर (अंदाजे ३० मीटर) मोकळे ठेवण्याचाच निकष असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : रस्ते अपघातांवर नियंत्रण आणि वाहतूक अधिक सुरक्षित होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांना सक्त निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ‘जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल’ स्थापन केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक महामार्गालगतच्या व्यावसायिक बांधकामांची माहिती मागविली असून, शहर हद्दीतून गेलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूस देखील जेवढ्या मीटरचा रस्ता तेवढे अंतर (अंदाजे ३० मीटर) मोकळे ठेवण्याचाच निकष असणार आहे. आता अशा सर्वांना नोटिसा बजावून पुढील ६० दिवसांत ती बांधकामे हटविली जाणार आहेत.

चारपदरी, सहापदरी महामार्ग करताना ४५ ते ६० मीटर, तर ग्रीनफिल्ड हायवेसाठी ७० ते ९० मीटर (दोन्ही बाजूंना ३५ ते ४५ मीटर समान प्रमाणात) अंतर सोडले जाते. शहर हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांलगत ६ मीटर अंतरात व्यावसायिक बांधकामे नको, असा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकष आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच शहर हद्दीतही रस्ता जेवढ्या मीटरचा, तेवढे अंतर दोन्ही बाजूला ठेवावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात दरमहा ४२ जणांचा (दररोज एक ते दोन) रस्ते अपघातात मृत्यू होतो. सांगोला, माळशिरस, बार्शी, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, माढा या तालुक्यांमध्ये अपघात व अपघाती मृत्यू अधिक आहेत. सोलापूर शहर हद्दीतही अपघाताचे प्रमाण जास्त आहे. अपघाताच्या प्रमुख कारणांमध्ये रस्त्यालगतचे अतिक्रमण हेही प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अशा बांधकामांवर कारवाईचे सक्त आदेश दिले आहेत.

महामार्गनिहाय दोन्ही बाजूचे सोडावे लागणारे एकूण अंतर

  • सोलापूर-हैदराबाद : ६० मीटर

  • सोलापूर-पुणे : ६० मीटर

  • सोलापूर-विजापूर : ८० मीटर

  • सोलापूर-तुळजापूर : ५० व ६० मीटर

  • सोलापूर-अक्कलकोट : ४५ मीटर (बायपासजवळ ६० मीटर)

  • सोलापूर-मंगळवेढा : ६० मीटर

  • मोहोळ-पंढरपूर : ४५ मीटर

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही

‘एनएचएआय’च्या हद्दीत अनधिकृतपणे बांधकामे केलेल्यांना सध्या आम्ही नोटिसा बजावल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत ठरावीक अंतर सोडावे लागणार आहे. त्या अंतरातील बांधकामधारकांना नोटिसा देण्यासंदर्भातील निर्णय अजून आम्हाला मिळालेला नाही. जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.

- स्वप्निल कासार, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सोलापूर

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलात सदस्य सचिव राष्ट्रीय महामार्गाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक असतील. पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, निवासी उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा प्रशासनाधिकारी (नगरपालिका), अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, आरटीओ, ‘नगररचना’चे सहाय्यक संचालक, पीडब्ल्यूडी व ‘एनएचएआय’चे अधीक्षक अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी सदस्य असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Kasaba Borgaon Drowning : चार बहिणीनंतर विकासचा जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; कासारी नदीत बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, पन्हाळ्यातील दुर्घटनेने हळहळ

Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT