Brijbhushan Singh Esakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोप खोटे, तरी...; महाराष्ट्रातील केंद्रीयमंत्र्यांचं मोठं विधान

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘राजर्षी शाहू महाराजांचे आंतर राष्‍ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्य शासनाने योजना जाहीर केली आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या खर्चातून भव्य दिव्य स्मारक करावे. निधी कमी पडून नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलेणच. याशिवाय महापालिकेने प्रस्ताव पाठवला तर केंद्र सरकारकडून काही मदत लागणार असल्यास मी पाठपुरावा करेण.’’ असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय रामदास आठवले यांनी आज दिले.

येथील शाहू समाधी स्थळी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना श्री. आठवले यांनी अभिवादन केले. यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘‘ राजर्षी शाहू महाराजांच्या शताब्दी वर्षाची सांगता होत आहे. कोल्हापूर संस्थात शाहू महाराजांचे कार्य उत्‍कृष्‍ठ होते त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध होते.

त्यांनी डॉ. आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली होती. राजर्षी शाहू महाराज सर्व जाती धर्माचे राजे होते. जाती व्यवस्था संपवली पाहीजे अशा दृष्ठीकोणाचे ते राजे होते त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चळवळ चालवतो. त्यांच्या स्मृती निमित्त मी अभिवादन केले.’’

श्री. आठवले म्हणाले की, ‘‘ ज्येष्ठ नेते शरद पवार नेते देशाचे नेते आहेत. वयोमानामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यांचा पक्षा अंतर्गत विषय आहे. तरीही त्यांच्या पक्षात देश संभाळणारा असा दुसरा नेता नसल्याने शरद पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आहे.

कोकण राजापूरातील बासतू उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रकल्पास मंजूरी दिली होती. मात्र श्री. ठाकरे महाविकास आघाडीत असल्याने ते या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. कोकणाच्या विकासासाठी असे प्रकल्प आले पाहीजेत. रोजगार मिळाला पाहीजे, प्रत्येक गोष्टीला विरोध झाला तर विकास होत नाही. तो प्रकल्प व्हावा त्यामुळे श्री. ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध करू नये अशी आमची विनंती आहे.’’

महिला कुस्ती स्पर्धेसाठी खासदार ब्रिजभूषण सिंह यांना निमंत्रण दिले त्यांच्या विरोधात कोल्हापूरात आंदोलन झाले आहे. या विषयी ते म्हणाले की, ‘‘ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काही आरोप आहेत ते आरोप खोटे असून त्याची चौकशी व्हावी असे आमचेही मत आहे.

न्यायालयात केस आहे. तरी त्यांना विरोध करणारे जसे आहेत तसे त्यांचे स्वागत करणारेही आहेत. मात्र या विषयात कोणी राजकारण करू नये, महिला कुस्तीत पुढे येतात, मुली भाग घेतात ही चांगली गोष्ट आहे. महिला कुस्ती स्पर्धांना आपल्या शुभेच्छा आहेत.’’

भाजप-शिवनेची सत्ता पुन्हा येईल

राज्यातील राजकीय परस्थिती चांगली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाणार नाही असे आम्हाला वाटते. शिंदे फडणवीस भाजप सेनेचे सरकार चांगले चालेल आहेत. २०२४ मध्ये हे सरकार पून्हा सत्तेत येणार आहे. असेही श्री. आठवले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT