Onion  esakal
महाराष्ट्र बातम्या

कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी भाव तीन हजारापेक्षा कमीच! सोलापूर बाजार समितीत गुरुवारी ३५३ गाड्या कांदा आवक; २० क्विंटल कांद्याला ५०० रुपयांचाच दर

सोलापूर बाजार समितीत गुरुवारी (ता. २८) ३५३ गाड्या कांद्याची आवक झाली होती. यंदा आवक कमी असूनही सरासरी भाव अडीच हजार ते २८०० रुपयांपर्यंतच स्थिर आहे. २० क्विंटल कांदा अक्षरश: ५०० रुपये दराने विकला गेला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २८) ३५३ गाड्या कांद्याची आवक झाली होती. यंदा आवक कमी असूनही सरासरी भाव अडीच हजार ते २८०० रुपयांपर्यंतच स्थिर आहे. २० क्विंटल कांदा अक्षरश: ५०० रुपये दराने विकला गेला आहे.

यावर्षी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला तर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. सततचा पाऊस व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा खराब झाल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. आज १० क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपयांचा दर मिळाला आहे. गुरुवारी सोलापूर बाजार समितीत एकूण ३५ हजार ३०७ क्विंटल (७० हजार ६१४ पिशवी) कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातील ३५ हजार २७७ क्विंटल कांदा सरासरी दोन हजार ८०० रुपये दराने विकला गेला आहे.

गतवर्षी याच हंगामात दररोज सोलापूर बाजार समितीत ७०० ते ८०० गाड्यांची आवक होती. परंतु, निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नसल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. आता निर्यातबंदी नसताना देखील भावात वधारणा झालेली नाही. दरम्यान, शेतकरी गडबड करून ओला कांदा विक्रीसाठी आणत असल्यानेही भाव वाढत नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी वाळलेला कांदा आणावा, त्याला चांगला दर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारची बाजार समितीतील स्थिती

  • एकूण आवक

  • ३५३ गाड्या

  • आवक क्विंटलमध्ये

  • ३५,३०७

  • एकूण किंमत

  • ९.८८ कोटी

  • सरासरी भाव

  • २८०० रुपये

बंगळूरच्या बाजाराचे शेतकऱ्यांना आकर्षण

सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल साडेतीन ते चार हजार रुपयांचा भाव असेल तर बंगळूरच्या बाजारात साडेचार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो क्विंटल कांदा बंगळूरच्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा आवक कमी असल्याने आगामी काही दिवसांत भाव आणखी वाढेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: इशान किशनची बॅट तळपली, ठोकलं पहिलं शतक; कर्णधार सूर्याचीही फिफ्टी; भारताच्या २७० धावा पार...

Pune Traffic: पुण्यातील ७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर गतिरोधक बसवणार; वाहतुकीच्या दृष्टीने मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update: सामाजिक जाणिवेशिवाय अभियांत्रिकी अपूर्ण - आयुक्त नवलकिशोर राम

Crime: धक्कादायक! आठवीतील मुलगी गर्भवती राहिली; वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहितीच नाही, नंतर... जे घडलं त्यानं सगळेच हादरले

IND vs NZ, 5th T20I: संजू सॅमसनने शेवटची संधीही गमावली, घरच्या मैदानातही स्वस्तात आऊट

SCROLL FOR NEXT