Solapur Crime. sakal
महाराष्ट्र बातम्या

स्मशानभूमीत दफन केलेला मृतदेह तिसऱ्या दिवशी गायब! सोलापूर पोलिसांनी श्वान पथक बोलावले, पण ते जागेवरच घुटमळले; जनावराने उकरले असल्याचा पोलिसांना संशय

मोदी स्मशानभूमीत दफन केलेल्या 6 महिन्याच्या बाळाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी जागेवर नसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. नातेवाईकांचा कोणावरही संशय नाही, पण स्मशानभूमीत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही असावे अशी त्यांची मागणी आहे. सदर बझार पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : मोदी स्मशानभूमीत दफन केलेल्या सहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी जागेवर नसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. नातेवाईकांचा कोणावरही संशय नाही, पण स्मशानभूमीत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही असावे अशी त्यांची मागणी आहे. सदर बझार पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

बाळाच्या डोक्याला मार लागल्याने १४ जून रोजी सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बाळाचा मृत्यू झाला होता. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास बाळाचा मृतदेह मोदी स्मशानभूमीत दफन केला होता. त्यावेळी खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरून वरील बाजूला फरशी, काटेरी फांद्या ठेवल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दफन केलेल्या बाळाला दूध ठेवण्यासाठी नातेवाईक मोदी स्मशानभूमीत आल्यानंतर त्याठिकाणचा खड्डा उकरलेला दिसला.

अर्धवट उकरलेल्या खड्ड्यात बाळाचा मृतदेह नव्हता, पण त्याच्या अंगावरील कपडे जवळच पडले होते. त्यानंतर याबद्दल माहिती मिळताच तातडीने सदर बझार पोलिस ठाण्याचे अधिकारी मोदी स्मशानभूमीत दाखल झाले. त्यावेळी श्वान पथक देखील तेथे आणले होते. बाळाचे कपडे श्वान पथकासमोर ठेवले, पण श्वान पथक जागेवरच घुटमळले. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार खड्डा उकरण्याची पद्धत जनावरांसारखी असून जनावरानेच हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तरीपण, पोलिस उपनिरीक्षक सागर काटे तपास करीत आहेत.

अधिक तपास सुरू आहे

मोदी स्मशानभूमीत भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्या बाळाचा मृतदेह दफन केलेल्या खड्ड्यात नसल्याची त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. खड्डा उकरण्याची पद्धत जनावरांचीच असून आम्ही अधिक तपास करीत आहोत.

- सचिन काटे, पोलिस उपनिरीक्षक, सदर बझार पोलिस ठाणे

कुटुंबीयांचे गंभीर आरोप

मोदी स्मशानभूमीत कोणताही सुरक्षारक्षक नाही. याठिकाणी सीसीटीव्ही देखील नाहीत. शहरातील अनेक मद्यपी स्मशानभूमीत मद्यपान करीत बसतात, आता पण दारूच्या बाटल्या दिसतात, असा आरोप मृत बाळाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यावर त्यांनी महापालिकेकडून सुधारणांची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT