CJI Lalit News esakal
महाराष्ट्र बातम्या

सरन्यायाधीशांनी सिनियरचा मानला सल्ला! ३९ वर्षांत ना कधी पैसे मागितले ना फी सांगितली

३९ वर्षांपूर्वी वकिली व्यवसायात पदार्पण करतेवेळी ‘पैशाच्या मागे कधी धावू नकोस, सरस्वतीची पूजा करत राहा, लक्ष्मी सदैव तुझ्या मागे येईल’, असा सल्ला माझ्या सिनियरने दिला.

तात्या लांडगे

सोलापूर : ३९ वर्षांपूर्वी वकिली व्यवसायात पदार्पण करतेवेळी ‘पैशाच्या मागे कधी धावू नकोस, सरस्वतीची पूजा करत राहा, लक्ष्मी सदैव तुझ्या मागे येईल’, असा सल्ला माझ्या सिनियरने दिला. त्यानुसार वाटचाल केली आणि ‘मी कधीच ना पैसे मागितले ना फी सांगितली’. आज मला अपेक्षेपेक्षा जास्त पैसा, किर्ती, नाव, समाधान मिळाले, असे सरन्यायाधीश उदय लळित यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल व सोलापूर बार असोसिएशनतर्फे सोलापुरात आयोजित राज्यस्तरीय वकिल परिषदेच्या उद्‌घाटनानिमित्त सरन्यायाधीश उदय लळित आज सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल कथन करीत नवोदित वकिलांना व तरूणांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकुर दत्ता, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, विनय जोशी, राज्याचे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकिल उज्वल निकम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, सदस्य जयंत जायभावे, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ठोकडे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी, जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी म्हणाले, सोलापूरचा माणूस न्यायव्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचल्याचा अभिमान आहे. विनम्र स्वभाव, संयमी वृत्ती, कोणालाही अपशब्द न बोलणारे, चौकटीबाहेर विचार करणारे त्यांचे गुण नवोदित वकिलांनी घ्यावेत. पैशासाठी वकिली न करता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करा.

फाईल म्हणजेच ‘लाईफ’

कोणत्याही प्रकरणाची फाईल वकिलांमार्फत न्यायाधीशांपर्यंत येतात. वकिलांसाठी ती फाईल असते, पण न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांसाठी ती लाईफ असते. वकिलांचे विशेषत: तरुणांचे भाषेवर प्रभुत्व असायला हवे. इंटरनेट हे माहितीचे साधन आहे, पण ज्ञानासाठी जर्नलस, पुस्तके, न्यायनिवाडे ही साधने आहेत. परिपूर्ण ज्ञानातून सर्वकाही मिळू शकते, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिपांकुर दत्ता यांनी व्यक्त केला.

व्यवसायात अडचणी आल्या, तरी खचू नका

व्यवसाय करताना अनेकदा प्रचंड त्रास होतो, ताण असतो, पण पॅशनमधून स्वत:वर आत्मविश्वास ठेवून वाटचाल केल्यास हे प्रोफेशन तुम्हाला सर्वकाही देईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक व्यवसायात अनंत अडचणी येतात, त्रास होतो, अपयश येते. आपल्या देशात ३० वर्षांखालील तरूणांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी आहे. जर्मनी, रशियासह इतर देशांमध्ये खूप सिनियर लोक आहेत. आपल्या तरूणांना धेयासक्ती हवी. देशाची घौडदौड तरूणांच्या हाती असून त्यांच्यासाठी ज्ञान, व्यवसायाच्या कक्षा खूप रुंदावल्या आहेत. पण, सचोटी, आत्मविश्वासाने पॅशन म्हणून काम केल्यास निश्चितपणे सर्वकाही सुरळीत होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT