shiv sena power struggle uddhav thackrey eknath shinde supreme court decision Maharashtra Political Crisis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : उद्धव ठाकरे 'त्या' चुकीमुळे येणार गोत्यात; सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला कलाटणी मिळणार?

उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ घोडचुकीवर सरन्यायाधीशांचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास अडीच दिवस युक्तिवाद केला आहे. आजही सकाळी (23 फेब्रुवारी) कपिल सिब्बल युक्तिवादाने कामकाजाची सुरुवात झाली. आजची सुनावणीही निर्णायक टप्प्यावर पोहोचली. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवले आहे. जर, बहुमत चाचणीला सामोर गेला असता तर आम्ही ती चाचणी रद्द ठरवली असती, असंही कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या 5 जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. उद्धव ठाकरे गटाचे जेष्ठ वकील प्रथम कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला आहे. आजच्या सुनावणीमध्ये बहुमत चाचणी, राज्यपालांनी घेतलेली भूमिका या सर्व घटकांवर जोरदार युक्तिवाद झाला.

तुम्ही बहुमत चाचणीला सामोरं गेला असता आणि 39 आमदारांमुळे हरला असता तर आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती असं मत सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवलं आहे. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरं गेला नाही. या 39 आमदारांनी तुमच्या सरकारविरोधात कुठेही मतदान केलेलं नाही. तुम्ही बहुमत चाचणीला पुढे गेले नाही, आम्ही काय करावं उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाची मोठी अडचण असल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितलं आहे.

तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला नाही. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता आणि 39 आमदारांनी विरोधात मतदान केल्याने हरला असता तर आम्ही ती बहुममत चाचणी रद्द केली असती. पण तुम्ही राजीनामा दिल्यामुळे अधिकार गमावला आहे. आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार?, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी केला आहे. तर जे झालं ते आता आम्ही बदलू शकत नाही, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

Pune School Controversy: शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे कापले केस; स्वतंत्र शुल्क आकारल्याची माहिती

SCROLL FOR NEXT