cm uddhav thackeray
cm uddhav thackeray  sakal media
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आज रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करणार

कार्तिक पुजारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यभरातून कोरोना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांनीही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते.

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यभरातून कोरोना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांनीही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आज महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या जनतेशी ते आज काय संवाद साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. मुख्यमंत्री कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. (maharashtra latest news)

राज्यात १० हजारांच्या आत कोरोना रुग्ण आढळून येत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. पण, आता दुसरी लाट आटोक्यात आली आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधात शिथिलता मिळावी अशी मागणी जनतेकडून होत आहे. असे असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने निर्बंधात शिथिलता देण्यास नकार दिला आहे.

रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी सरकार निर्बंधात सूट देत नसल्याने जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. दुसरी लाट ओसरली तरी निर्बंध कायम आहेत. तसेच तिसरी लाट आली की पुन्हा राज्य टाळेबंदीत जाण्याची शक्यता आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत असल्याने व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. दुकानदारांनी नियम धुडकावून दुकाने सुरु ठेवण्याचा इशारा दिला आहे. दबाव वाढत असल्याने राज्य सरकारला काहीतरी निर्णय घेणे भाग पडणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री महत्त्वाची घोषणा करु शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT