MP Dr. Jayasiddheshwar Shivacharya Mahaswami esakal
महाराष्ट्र बातम्या

उच्च न्यायालयाची ऑर्डर समितीला मिळाली! खासदार डॉ. महास्वामींच्या ‘जात पडताळणी’ची २८ जुलैपासून पुन्हा सुनावणी

सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर पुन्हा सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाची ऑर्डर पडताळणी समितीला मिळाली आहे. २८ जुलैला खासदारांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या फेर पडताळणीची कार्यवाही सुरु करणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाची ऑर्डर सोलापूर पडताळणी समितीला मिळाली आहे. २८ जुलैला समितीचे सदस्य खासदारांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या फेर पडताळणीची कार्यवाही सुरु करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदारांनी बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर समितीने दक्षता पथक नेमून खासदारांच्या मूळ गावापासून प्रमाणपत्र दिलेल्या तहसील कार्यालयापर्यंतची सर्व कागदपत्रे पडताळून पाहिली. सुनावणीअंती प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल समितीने दिला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या निकालानुसार अक्कलकोट तहसीलदारांच्या माध्यमातून खासदार डॉ. महास्वामींविरूद्ध कलम ‘४२०’अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला. त्यावर डॉ. महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

काही दिवसांपूर्वी त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देत या जात पडताळणी प्रकरणी फेर तपासणी करून समितीने निकाल द्यावा, असे आदेश दिले. त्यानुसार आता जात पडताळणी समितीचे कामकाज सुरु झाले आहे. त्यामुळे आता खासदारांना पुन्हा त्यासंदर्भातील सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.

२८ जुलैला समितीसमोर सुनावणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी होईल. आदेशातील प्रत्येक मुद्द्यावर योग्य ती कार्यवाही करून न्यायालयास अहवाल दिला जाईल.

- ज्ञानदेव सूळ, अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर

पोलिसांमधील ‘४२०’चा गुन्हा रद्द होणार का?

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडील जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल सोलापूरच्या जात पडताळणी समितीने दिला. त्यावेळी त्यांच्यावर सदर बझार पोलिसांत कलम ‘४२०’अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्यावरील हा गुन्हा रद्द होऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, न्यायालयाने पोलिसांना यासंदर्भात कोणतेही आदेश दिले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची फेरचौकशी होत असल्याने त्या गुन्ह्याचा तपास तुर्तास थांबेल, पण गुन्हा न्यायालयाच्या आदेशाशिवाय रद्द होत नाही. न्यायालयाचे पोलिसांना तसे आदेश प्राप्त झाल्याशिवाय गुन्हा रद्द होऊ शकत नाही, असेही त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT