solapur hospital solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

मृत्यूच्या दारातही रुग्णाचे हाल! 6 वर्षांनंतरही सोलापुरातील सर्वोपचार रूग्णालयात नाही सिटी-स्कॅनची सोय; मंत्र्यांकडे वारंवार मागणी, निवेदने तरी दखल नाहीच

ओपीडीत दररोज 1600 रूग्ण उपचारासाठी येतात आणि त्यातील जवळपास 200 रूग्ण ॲडमिट होतात. त्यातील काहींना सिटीस्कॅनची गरज असतानाही रूग्णालयात सोय नाही. 6 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा झाला, पण मशिन मिळाली नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह धाराशिव, लातूर, पुणे (इंदापूर) या जिल्ह्यांसह कर्नाटकातील मोठ्या प्रमाणावरील रूग्ण सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दाखल होतात. ओपीडीत दररोज सोळाशे रूग्ण उपचारासाठी येतात आणि त्यातील जवळपास २०० रूग्ण ॲडमिट होतात. त्यातील काहींना सिटीस्कॅनची गरज असतानाही रूग्णालयात त्याची सोय नाही. सहा वर्षांपासून वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा झाला, पण सर्वोपचार रुग्णालयाला मशिन मिळाली नाही हे विशेष.

सोलापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात झालेल्या अपघातात जखमी रूग्ण सर्वोपचार रूग्णालयात येतात. त्यावेळी रुग्णाला सिटीस्कॅनची गरज भासते, पण त्याठिकाणी ती सोय नसल्याने रुग्णाला पुन्हा खासगी रूग्णालयात न्यावे लागत आहे. मृत्यूच्या दारात असतानाही रुग्णाला मरणयातना सोसाव्या लागत असल्याची स्थिती सर्वोपचार रूग्णालयात पाहायला मिळत आहे. सोलापुरातील सर्वोपचार रूग्णालयात रुग्णांची दाटी होत असल्याने सोलापूर शहरातील गुरूनानक चौकात जिल्हा रूग्णालय (१०० खाटा महिला व शिशू रूग्णालय आणि १०० खाटांचे सर्वोपचार रूग्णालय) सुरू झाले. ज्याठिकाणी शेकडो रूग्ण दाखल होतात, त्याच ठिकाणी रुग्णांना सर्व सोयी-सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दुसऱ्या मजल्यावर दाखल रुग्णाला स्ट्रेचरवरून खाली आणले जाते, त्यानंतर रुग्णवाहिकेत घालून दुसऱ्या रूग्णालयात नेले जाते. त्यानंतर तेथून आणून पुन्हा ॲडमिट केले जाते. या दरम्यान, रूग्ण दगावण्याची भीती नातेवाइकांना असते. अशी भयावह स्थिती असल्याने सर्वोपचार रुग्णालयास आतातरी मशिन मिळेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

तूर्तास करारानुसार दुसऱ्या खासगी रुग्णालयात सिटीस्कॅन

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयातील सिटीस्कॅन मशिन सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मागितला आहे. तो निधी प्राप्त झाल्यानंतर रूग्णालयात सिटीस्कॅन सुरू होईल. तूर्तास रुग्णाचे सिटी स्कॅन करारानुसार दुसऱ्या खासगी रुग्णालयातून केले जाते.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर

सर्वोपचार रूग्णालयाची स्थिती

  • रूग्ण दाखल क्षमता

  • ८५०

  • दररोज ॲडमिट

  • २०० ते २५०

  • दररोज ‘ओपीडी’तील रूग्ण

  • १,६००

अधिवेशनात विषय, मंत्र्यांची ग्वाही, तरी...

संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटनेसह इतर सामाजिक संघटनांनी सर्वोपचार रूग्णालयात सिटीस्कॅनची सोय करावी म्हणून वारंवार निवेदने देऊन मागणी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच्या राज्याच्या अधिवेशनात देखील हा विषय मांडला होता. त्यावेळी मंत्र्यांकडून मशिन देण्याची ग्वाही देखील दिली होती. मात्र, अद्याप सर्वोपचार रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन बसविण्यात आलेली नाही. रुग्णाला सिटीस्कॅन मशिनसाठी पदरमोड करावी लागत आहे.

नव्या रुग्णालयातही नाही सिटीस्कॅन, सोनोग्राफीची सोय

लोकसभा निवडणुकीपूर्वी गुरूनानक चौकातील जिल्हा रूग्णालय सुरू झाले. पण, आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली तरीदेखील हे रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्या रूग्णालयात अद्याप सिटीस्कॅन सोनोग्राफी, मॅमोग्राफीची सोय झालेली नाही. या जिल्हा रूग्णालयात सध्या केवळ एक्स-रे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT