आयटी पार्क sakal
महाराष्ट्र बातम्या

देशातील तिसरी मोठी आयटी पार्क सोलापुरात! २ लाख रोजगार निर्मिती; ‘MIDC’कडे जमिनीचे हस्तांतरण होणार; १८ महिन्यांत पूर्ण होणार मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट

होटगी येथे ५० एकरावर उभारले जाणारे आयटी पार्क देशातील तिसऱ्या क्रमांकाचे पार्क असणार आहे. पुढील १८ महिन्यांत प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर गतीने कार्यवाही सुरू आहे. या आयटी पार्कमुळे दोन लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : होटगी येथे ५० एकरावर उभारले जाणारे आयटी पार्क देशातील तिसऱ्या क्रमांकाचे पार्क असणार आहे. पुढील १८ महिन्यांत प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर गतीने कार्यवाही सुरू आहे. जलसंपदा विभागाने जमीन दिल्यानंतर एमआयडीसीने तिच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या आयटी पार्कमुळे दोन लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्त केला आहे.

होटगी परिसरातील ५० एकराचे सुरवातीला गॅझेट होऊन ताबा एमआयडीसीकडे देण्यात येईल. त्यानंतर आराखडा तयार होऊन प्लॉट पाडले जातील. त्यासाठी साधारणत: एक वर्ष लागेल, असे एमआयडीसीचे अधिकारी सांगतात. त्या जागेसाठी जलसंपदा विभागाने तीन कोटी २० लाखांचा मोबदला मागितला आहे. परंतु, ती जागा विनाशुल्क द्यायची, रेडीरेकनर दरानुसार की ५० टक्के दरात द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांचीही भूमिका यात निर्णायक आहे.

दरम्यान, या आयटी पार्कमुळे कॉम्प्युटर, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांनाही जॉबची संधी असणार आहे. याशिवाय विविध प्रशिक्षण संस्था, रुग्णालये, हॉटेल, वाहतूक अशा व्यवसायाच्या माध्यमातून लाखो तरुण-तरुणींना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. या आयटी पार्कमुळे सोलापुरातून दरवर्षी तरुण अभियंत्यांचे होणारे स्थलांतर थांबेल, त्यातून सोलापूरचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी व्यक्त केला आहे.

...तर उद्योजकांना प्रतिचौरस मीटर १२०० रुपयाला मिळणार जागा

होटगी येथील आयटी पार्कच्या ५० एकर जागेसाठी जलसंपदा विभागाने २०२४ च्या रेडिरेकनर दरानुसार तीन कोटी २० लाख रुपयांची मागणी केली आहे. पण, ती शासनाचीच जागा असल्याने आयटी उद्योजकांना स्वस्तात जागा मिळावी, यासाठी विनाशुल्क जागा हस्तांतरित करावी, असा प्रस्ताव ‘एमआयडीसी’ने शासनाला पाठविला आहे. तो प्रस्ताव मान्य झाल्यास उद्योजकांना होटगीतील ती जागा प्रतिचौरस मीटर १२०० रुपयाला मिळू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिकेकरवाडीत कोचिंग टर्मिनल

टिकेकरवाडी येथे रेल्वेचे कोचिंग टर्मिनल प्रस्तावीत आहे. त्या ठिकाणी टर्मिनल झाल्यास सोलापूरहून बंगळुरू, मुंबईला ये-जा करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढेल. त्या टर्मिनलच्या ठिकाणी सोलापुरातून निघणाऱ्या गाड्या थांबतील व त्यांचा मेन्टेनन्स तेथे होईल. टिकेकरवाडी येथे जाऊन पाच दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे व रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी पाहणी केली आहे. होटगी येथे आयटी पार्क झाल्यास या टिकेकरवाडी टर्मिनलचा मोठा फायदा अभियंते, उद्योजकांना होईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

ती जागा विनाशुल्क मिळावी, यासाठी प्रयत्न

जलसंपदा विभागाने होटगी येथील जागा आयटी पार्कसाठी द्यायचा निर्णय घेतला आहे. आता तर जागा आमच्याकडे हस्तांतरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. उद्योजकांना डेव्हलपमेंट व रेडिरेकनर दरानुसार प्रति चौरस मीटर जागा उद्योजकांना दिली जाते. पण, ती जागा विनाशुल्क मिळावी, अशीही आमची मागणी आहे.

- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर

जिल्ह्यातील अभियांत्रिकीची स्थिती

  • एकूण महाविद्यालये

  • १५

  • दरवर्षी शिक्षण पूर्ण करणारे अभियंते

  • ७,५००

  • ‘आयटी’शी संबंधित अभियंते

  • ४,२००

  • दरवर्षी स्थलांतर करणारे अभियंते

  • ९० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोने कोसळले मात्र चांदी झाली महाग; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्येत रोड शो

Dharmendra: धर्मेंद्र यांच्या विनम्रतेने भारावले होते नागपूरकर; अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करणारा विनम्र ‘ही-मॅन’

Mahadev Jankar : 'आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका'; प्रचार सभेत महादेव जानकरांचा भाजपवर जोरदार निशाणा

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार; पायली-भटाळी जंगलातील घटना

SCROLL FOR NEXT