Mumbai Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'मशाल' ठाकरेंचीच! समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. या चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. (The Delhi High Court dismissed the plea of Samata Party mashal As Symbol For Uddhav Thackeray Andheri By Poll Election )

निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेल्या ‘धगधगती मशाला’ या चिन्हावर समता पक्षाने काही दिवसांपूर्वी दावा केला होता. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पक्षाने केली होती. त्याबाबत समता पक्षाकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या चिन्हावर आपला अधिकार आहे हे दाखवण्यात समता पक्ष यशस्वी होऊ न शकल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात आल्याचे न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

१९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला आहे. तर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीने केलेला आहे. "२००४ साली समता पार्टीची राज्यपक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे," असे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्रुनेश देवळेकर यांनी यापूर्वीच सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL vs County Cricket वरून वातावरण तापलं! पीटरसनवर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टिका, 'बस कर आता, मुर्खा...'

SIR वैधच! निवडणूक आयोगाला मतदार यादीतून नाव हटवण्याचा आणि समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार : सुप्रीम कोर्ट

Earbuds Safety Tips : कानातले इअरबड्स बनतील 'जाजूस'; पर्सनल बोलणं होऊ शकतं लिक, त्यामुळं चुकूनही सुरू ठेवू नका 'ही' 1 सेटिंग

Gokul Milk Halal Clarification : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र का घेतलं? परिपत्रकाद्वारे केला खुलासा; 'हलाल' शब्दाचा अर्थही सांगितला

Railway Ticket Price: रेल्वे तिकीटाचे दर वाढणार! प्रवाशांचा खिशाला फटका बसणार; रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT