

Paan Vendor Turns Train Berth Into Mini Shop
esakal
Paan Vendor Turns Train Berth Into Mini Shop : रेल्वे प्रवासादरम्यान, तुम्ही अनेकदा चहा, कॉफी, समोसे आणि पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांना पाहिले असेल. पण, तुम्ही कधी एसी कोचमध्ये कोणाला पानाचे विडे बनवून विकताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती रेल्वेच्या खालच्या बर्थवर बसून पान बनवताना दिसत आहे. त्याने बर्थवर एक कापड पसरले आहे, त्यावर पान बनवण्यासाठी लागणारे साहित्य मांडले आहे आणि तो एकामागून एक पानं तयार करण्यात मग्न आहे. कोचमधील इतर प्रवासी त्याला असे करताना पाहत आहेत.