कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतरही 'डेल्टा प्लस'ची बाधा ! 'यांना' सर्वाधिक धोका Canva
महाराष्ट्र बातम्या

कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतरही 'डेल्टा प्लस'ची बाधा !

कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतरही 'डेल्टा प्लस'ची बाधा ! 'यांना' सर्वाधिक धोका

तात्या लांडगे

कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर डेल्टा आणि आता डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचा विळखा वाढू लागला आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटेनंतर डेल्टा (Delta) आणि आता डेल्टा प्लस (Delta Plus) या नव्या व्हेरिएंटचा विळखा वाढू लागला आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 103 रुग्ण आढळले असून त्यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृतांमधील दोघांनी प्रतिबंधित लसीचे (Covid-19 Vaccine) दोन्ही डोस घेतले होते, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Public Health) दिली.

राज्यातील निर्बंध शिथिलतेनंतर गर्दी विशेषत: बाजारपेठांमधील गर्दी वाढली आहे. 60 टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्‍ती मास्कविना फिरत असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत जळगाव जिल्ह्यात 13, रत्नागिरीत सर्वाधिक 15, कोल्हापूर जिल्ह्यात सात, ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोलीत प्रत्येकी सहा, नागपुरात पाच, नगरमध्ये चार, पालघर, रायगड, यवतमाळमध्ये प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदूर्ग व नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण डेल्टा प्लस बाधित आढळला आहे. त्यापैकी रत्नागिरीतील दोन तर बीड, मुंबई, रायगडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. लस घेऊनही डेल्टा प्लसची बाधा होत असल्याने बुस्टर डोसची गरज व्यक्‍त केली जात आहे. तर डेल्टा प्लसचा वाढलेला धोका आणि सण-उत्सव काळातील गर्दीचा अंदाज घेऊन पुन्हा एकदा राज्यातील निर्बंध कडक होतील, असे आपत्ती व्यवस्थापन विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

डेल्टा प्लसचा "यांना' सर्वाधिक धोका

कोरोनाप्रमाणेच डेल्टा प्लस विषाणूचाही सर्वाधिक धोका को-मॉर्बिड (पूर्वीचा आजार असलेले रुग्ण) रुग्णांनाच आहे. राज्यातील एकूण 103 रुग्णांपैकी 19 ते 60 वयोगटातील 80 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे को-मॉर्बिड आणि लस न घेतलेल्या रुग्णांचा त्यात समावेश आहे. डेल्टा प्लसच्या आकडेवारीतून हे स्पष्ट होते की, को-मॉर्बिड, प्रतिबंधित लस न घेतलेले आणि वयस्क (ज्येष्ठ नागरिक) व्यक्‍तींनाच या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे.

कोरोना हा विषाणू कधीपर्यंत हद्दपार होईल हे सांगता येणे कठीण आहे. विषाणूच्या अंदाजित सात ते आठ लाटा असतील. परंतु, नागरिकांनी लसीकरण करून घेणे आणि नियमांचे पालन केल्यास निश्‍चितपणे धोका टळेल.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

रुग्णांसंबंधी ठळक बाबी...

  • राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे आढळले 103 रुग्ण; नियमांचे उल्लंघन वाढले

  • 17 रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते तर 18 जणांनी पहिला डोस घेतला होता

  • तीन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू; मृतांमधील दोन रुग्णांनी घेतले होते लसीचे दोन्ही डोस

  • 18 वर्षांखालील दहा, 19 ते 45 वयोगटातील 55 तर 46 ते 60 वयोगटातील 25 आणि 60 वर्षांवरील 13 रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT