Dr. Valsangkar suicide case

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

डॉ. वळसंगकर कुटुंबातील वाद संपेना! जावई फडके यांची डॉ. शोनालीविरुद्ध तर डॉ. शोनालींचीही फिर्याद, आता सासू डॉ. उमा वळसंगकर यांची सुनेविरुद्ध फिर्याद, नेमका वाद काय, वाचा...

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आता पोलिसांत गेला आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध फिर्यादी दिल्या आहेत. त्यांच्या सोलापुरातील एसपी न्यूरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विनापरवाना व बेकायदा प्रवेश करून अरेरावी, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची फिर्याद डॉ. उमा वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आता पोलिसांत गेला आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध फिर्यादी दिल्या आहेत. त्यांच्या सोलापुरातील एसपी न्यूरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विनापरवाना व बेकायदा प्रवेश करून अरेरावी, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची फिर्याद डॉ. उमा वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून त्यांची सून डॉ. शोनाली वळसंगकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३२९(१), ३५१(२)(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. उमा यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. शोनाली वळसंगकर यांनी हॉस्पिटलमध्ये बेकायदा प्रवेश करून अरेरावी केली, शिवीगाळ केली तसेच बघून घेईन अशी धमकी दिली. दरम्यान, या प्रकरणावर डॉ. शोनाली वळसंगकर यांनी सकाळकडे प्रतिक्रिया दिली आहे. या रुग्णालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी त्यांचे फुटेज तपासल्यास प्रत्यक्षात काय घडले, हे स्पष्ट होईल. मी या घरची सून आहे. माझ्याच घरात माझा प्रवेश बेकायदा किंवा विनापरवाना कसा ठरू शकतो? असा प्रश्न डॉ. शोनाली यांनी केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल राजगुरू करीत आहेत. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी डॉ. शोनाली या रुग्णालयातील घरी राहायला गेल्या होत्या. त्यावरून १८ जूनला त्यांच्या नणंदेचा पती सुजय फडके यांनी त्यांला धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, यासंदर्भात डॉ. शोनाली यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तर फडके यांनी देखील डॉ. शोनाली यांनी आपल्याला धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची फिर्याद दिली होती. आता या कुटुंबातील डॉ. उमा यांनी पोलिसांत सूनेविरुद्धच धाव घेतली आहे.

‘पोक्सो’ गुन्ह्यात जावई सुजय फडके यांना चौकशीची नोटीस

डॉ. उमा वळसंगकर यांचे जावई सुजय फडके यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी सदर बझार पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासाच्या अनुषंगाने फडके यांना दोन-तीन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिनेश कुलकर्णी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT