mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पोलिस भरतीत ‘EWS’मधून मेरिटमध्ये आलेल्या मराठा समाजातील तरूणांचे स्वप्न भंगणार; ‘या’ उमेदवारांना द्यावे लागणार महिन्याच्या मुदतीचे हमीपत्र

पोलिस भरतीची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर अनेक जिल्ह्यांमधील उमेदवारांची लेखी परीक्षा देखील झाली आहे. त्यात मराठा समाजातील अनेक तरूण-तरूणी ‘ईडब्ल्यूएस’च्या मेरिटनुसार पोलिस भरती होणार आहेत. मात्र, आता त्यांना ‘एसईबीसी’ आरक्षणामुळे प्रवर्ग बदलावा लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस भरतीची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर अनेक जिल्ह्यांमधील उमेदवारांची लेखी परीक्षा देखील झाली आहे. त्यात मराठा समाजातील अनेक तरूण-तरूणी ‘ईडब्ल्यूएस’च्या मेरिटनुसार पोलिस भरती होणार आहेत. मात्र, आता त्यांना ‘एसईबीसी’ आरक्षणामुळे प्रवर्ग बदलावा लागणार आहे. त्यामुळे निवड होणाऱ्या अनेक उमेदवारांची संधी हुकणार असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या एका परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत काय करावे, यावर आयोगाने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानंतर शासनाने ‘ईडब्ल्यूएस’मधील मराठा समाजाच्या उमेदवारांना प्रवर्ग बदलावा लागेल, असे सांगितले होते.

आता याच धर्तीवर पोलिस भरतीतील ‘ईडब्ल्यूएस’मधील मराठा उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा, यासंदर्भात मार्गदर्शन करावे असे पत्र गृह मंत्रालयास पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून अद्याप मार्गदर्शन प्राप्त न झाल्याने मेरिट यादी लागूनही ‘ईडब्ल्यूएस’मधील मराठा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही थांबविण्यात आली आहे. त्या उमेदवारानंतर मेरिटनुसार पुढच्या क्रमांकावरील उमेदवाराला देखील तुर्तास नियुक्तीपत्र देवू नयेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यावरील अंतिम निर्णय शासनाच्या मार्गदर्शनानंतर घेतला जाणार असून अद्याप शासनाकडून त्यासंदर्भातील मार्गदर्शन आलेले नाही.

उमेदवारांना द्यावे लागणार ‘एसईबीसी’चे हमीपत्र

ज्या घटकाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने ‘ईडब्ल्यूएस’मधून १० टक्के आरक्षण दिले. राज्यातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजासाठी राज्य सरकारने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘एसईबीसी’तून १० टक्के आरक्षण लागू केले. पण, तत्पूर्वी जाहीर झालेल्या १७ हजार ४७१ पोलिस भरतीसाठी अनेक मराठा तरूण-तरूणींनी ‘ईडब्ल्यूएस’मधून अर्ज भरले. आता ‘एसईबीसी’तून आरक्षण मिळाल्याने नियमांनुसार त्या उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’चा हक्क सोडावा लागणार आहे. त्यासाठी आता त्यांना एक महिन्यात ‘एसईबीसी’ किंवा कुणबी असल्यास ‘ओबीसी’चा दाखला द्यावा लागणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे दाखले नाहीत त्यांना खुल्या प्रवर्गाचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

पोलिस भरतीची स्थिती

  • एकूण जागा

  • १७,४७१

  • एकूण अर्ज

  • १७.७६ लाख

  • लेखी परीक्षा

  • ६ ते ८ ऑगस्ट

  • ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राची मुदत

  • ३० दिवस

सप्टेंबरमध्ये नवप्रविष्ठांच्या प्रशिक्षणाला सुरवात

मराठा समाजातील ज्या उमेदवारांची ‘ईडब्ल्यूएस’च्या मेरिटनुसार पोलिस भरतीसाठी निवड होणार आहे, त्यांच्या बाबतीतील निर्णय प्रलंबित ठेवून (शासनाचे मार्गदर्शन येईपर्यंत) उर्वरित प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर त्या नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

मेरिटमधील एका तरूणीची व्यथा

सोलापूर शहर आयुक्तालयाच्या पोलिस भरतीची मैदानी, लेखी परीक्षा पार पडल्यानंतर गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यात मराठा समाजातील एक तरूणी ‘ईडब्ल्यूएस’मधून मेरिटमध्ये बसली आहे. मात्र, ‘एसईबीसी’चे मेरिट जास्त असल्याने आणि तिला प्रवर्ग बदलावा लागणार असल्याने भरतीतून बाहेर जावे लागणार असल्याची वस्तुस्थिती आहे. अशीच स्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT