Maharashtra Politics ed  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: माजी आमदाराकडून ईडीने केली १५२ कोटींची मालमत्ता जप्त !

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics: शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या १५२ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांवर ईडीने आज सायंकाळी जप्तीची कारवाई केली. त्यामध्ये भूखंड, बंगला तसेच रहिवासी संकुलाचा समावेश आहे.

विवेक पाटील हे कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. याच बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

जप्त मालमत्तेमध्ये विवेक पाटील यांच्या कर्नाळा महिला रेडिमेड गारमेंट्स कोआॅपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ३८६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे

कर्नाळा बँकेत ५१२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील हे मुख्य आरोपी असल्याचे समोर आले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये या घोटाळ्याप्रकरणी १७ संचालकांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर ईडीने याप्रकरणी तपास सुरू केला. चौकशीअंती १२ ऑगस्ट २०२१ रोजी विवेक पाटील यांना ईडीने अटक केली. त्या वेळी त्यांची २३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात ते सध्या कारागृहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT