Drought  esakal
महाराष्ट्र बातम्या

संपूर्ण सोलापूर दुष्काळाच्या दुष्टचक्रात! जिल्ह्यातील ९१पैकी ८१ महसूल मंडळात १ जूनपासून तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलाच नाही

जिल्ह्यातील ९१ पैकी ८१ महसूल मंडळांमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यात तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलेला नाही. पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या चार तालुक्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. अक्षरश: बळीराजाच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी पिके माना टाकत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांपैकी ८१ मंडळांमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यात तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलेला नाही. पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या चार तालुक्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. अक्षरश: बळीराजाच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी पिके माना टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्याची भिस्त उजनीवर अवलंबून आहे. पण, पावसाअभावी उजनी धरण सध्या १६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात एकरुख, हिंगणी, मांगी, आष्टी, जवळगाव, बोरी, पिंपळगाव ढाळे या मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी नाही. पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीपात पेरलेली मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, बाजरी, सुर्यफूल या पिकांना फुले सुद्धा आली नाहीत.

जिल्ह्यातील बहुतेक महसूल मंडळांमध्ये १ जूनपासून एकही मोठा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीचा खर्च देखील निघणार नाही, अशी चिंताजनक स्थिती आहे. दोन-तीन दिवसांत पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे पूर्ण होऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाला पाठविला जाईल. पण, सद्य:स्थितीत ७५ ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे चित्र आहे.

१ जूनपासून ६० दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड

तालुका महसूल मंडळ

  • उत्तर सोलापूर तिऱ्हे, वडाळा

  • बार्शी बार्शी, आगळगाव, उपळे दुमाला, गौडगाव, खांडवी, पानगाव, पांगरी, नारी, सुर्डी

  • अक्कलकोट अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, मैंदर्गी, चपळगाव, किणी, दुधनी

  • द. सोलापूर सोलापूर, वळसंग, मंद्रूप, होटगी, निंबर्गी, विंचूर

  • मंगळवेढा बोराळे, मरवडे, आंधळगाव, मारापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती

  • सांगोला सांगोला, शिवणे, जवळा, हतीद, सोणंद, महूद, कोळा, नाझरा, संगेवाड

  • माळशिरस माळशिरस, इस्लामपूर, सदाशिवनगर, दहिगाव, नातेपुते, अकलूज, लवंग, महाळूंग, वेळापूर, पिलीव

  • करमाळा करमाळा, अर्जूननगर, केम, सोलसे, कोर्टी, उमरड, केतूर

  • मोहोळ कामती, टाकळी, पेनूर, वाघोली, नरखेड, शेटफळ

  • माढा माढा, दारफळ, कुर्डुवाडी, रोपळे, म्हैसगाव, टेंभुर्णी, मोडनिंब, लऊळ

  • पंढरपूर पंढरपूर, भंडिशेगाव, भाळवणी, करकंब, पिराचीकुरोली, पुळुज, चळे, तुंगत, कासेगाव

उजनीची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ७२.२३ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ८.५९ टीएमसी

  • ‘उपयुक्त’ची टक्केवारी

  • १६ टक्के

ठळक बाबी...

  • - जिल्ह्यात यंदा खरीपाची तीन लाख ३५ हजार १०२ हेक्टरवर (११६ टक्के) पेरणी

  • - जिल्ह्यात खरीपाचे दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर सरासरी क्षेत्र

  • - पावसाअभावी तब्बल पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके वाया गेल्याची स्थिती

  • - जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनंतर ३० दिवसांत पिकविमा कंपन्यांना भरपाई द्यावी लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT