SSC_HSC_Students sakal
महाराष्ट्र बातम्या

बाह्यपरीक्षक घेणार दहावी-बारावीचे ‘प्रात्यक्षिक’! परीक्षा केंद्रांवर ३ तास बैठे पथक अन् कॅमेऱ्यांचा वॉच

१ फेब्रुवारीपासून बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होऊन २० फेब्रुवारीपर्यंत संपेल. तर १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील परीक्षक प्रात्यक्षिक परीक्षा घेणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित झाले असून त्यापूर्वी प्रात्यक्षिक तथा मौखिक परीक्षा होईल. १ फेब्रुवारीपासून बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होऊन २० फेब्रुवारीपर्यंत संपेल. तर १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील परीक्षक प्रात्यक्षिक परीक्षा घेणार आहेत. कोरोनामुळे गतवर्षी तसे झाले नव्हते.

राज्यातील नऊ हजार परीक्षा केंद्रांवर दहावीचे १७ लाख तर बारावीचे जवळपास १५ लाख विद्यार्थी परीक्षा देतील. काही ठिकाणी नवीन परीक्षा केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे माध्यमिक बोर्डाने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भरारी पथक, बैठे पथकांशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रांवर आता मोबाईल कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसेच पूर्णवेळ परीक्षा केंद्राबाहेर बैठे पथक असणार असून केंद्रावरील प्रत्येक हालचाल वरिष्ठांपर्यंत कळवली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा बसेल हा त्यामागील हेतू आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी करावा प्रश्नपत्रिकांचा सराव

प्रात्यक्षिक परीक्षा संपताच बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर २१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाचा असेल. तर दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी मराठी विषयाचा पेपर होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा या हेतूने भाषा विषय सोडून इतर विषयांच्या प्रत्येक पेपरमध्ये किमान एक दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अजून लेखी परीक्षा सुरू व्हायला भरपूर कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे तीन तासांत सोडवता येतील, यादृष्टीने सराव करावा, असेही आवाहन विषय शिक्षकांनी केले आहे.

संपूर्ण तीन तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका दिल्यापासून सर्व उत्तरपत्रिका संकलित करेपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय यंदा बोर्डाने घेतला आहे. परीक्षा हॉलमध्ये सोडताना प्रत्येक विद्यार्थ्यास तपासूनच आत प्रवेश दिला जाणार आहे. तरीपण, ज्या हॉलमधील विद्यार्थी कॉपी करून लिहिताना आढळल्यास संबंधित परीक्षकावर कारवाई केली जाणार आहे. अनेक केंद्रावर वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना काही वेळा सांगण्याचेही प्रकार होतात. आता व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे त्याला पूर्णपणे आळा बसणार आहे.

ठळक बाबी...

  • बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २० फेब्रुवारीपर्यंत संपणार

  • दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत चालेल

  • बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर (इंग्रजी) २१ फेब्रुवारीला सुरु होईल

  • दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २ मार्चपासून; पहिला पेपर मराठी विषयाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT