पैसे sakal
महाराष्ट्र बातम्या

पैसे, दारु वाहतुकीवर असणार 46 भरारी पथकांचे लक्ष! निवडणुकीवेळी प्रत्येक वाहनांची तपासणी; निवडणूक जाहीर झाल्यावर शिक्षकांसह 25000 कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग

निवडणूक काळात पैसा, दारूची अवैध वाहतूक होते, अशी आजवरील स्थिती आहे. अशा अवैध हालचालींवर वॉच ठेवून जिल्ह्यात प्रत्येक संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार आहे. सीमेवर नाकाबंदी असणार आहे. त्यासाठी ४६ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : निवडणुकीच्या काळात पैसा, दारूची अवैध वाहतूक होतेच, अशी आजवरील स्थिती आहे. अशा अवैध हालचालींवर वॉच ठेवून जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी असणार आहे. वाहनांची तपासणीसह इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ४६ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणुकीवेळी मतदारांना कशाचेही प्रलोभन तथा आमिष दाखवू नये, तसे केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. तरीही, अनेकदा रात्री-अपरात्री मतदारांना पैसा, दारू दिली जाते, असे यापूर्वीच्या निवडणुकांमधील कारवायातून दिसून येते. दुसरीकडे अनेकदा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग केला जातो. त्या बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या भरारी पथकांवर असणार आहे.

निवडणूक काळात २४ तास ही पथके जिल्हाभर गस्त घालणार आहेत. वाहनांची तपासणी कशी करायची, त्यावेळी कोणती खबरदारी घ्यायची, आचारसंहितेचा भंग झाल्यास नेमकी काय करवाई करायची अशा बाबींची माहिती या पथकांमधील अधिकाऱ्यांना शनिवारी (ता. ९) दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडेल. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महसूल अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित असणार आहेत.

भरारी पथकांचे (फ्लाईंग स्कॉड) आज प्रशिक्षण

लोकसभा निवडणुकीवेळी संशयास्पद वाहनांची तपासणी होते. पैसा, दारू यासह अन्य वस्तूंची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. त्यासाठी यंदा ४६ भरारी पथके नेमली असून त्याचे उद्या (शनिवारी) प्रात्यक्षिक होणार आहे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

निवडणूक जाहीर झाल्यावर २५ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात जाहीर होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदानापूर्वी साधारणत: ३५ ते ४० दिवसांचा अवधी असतो. त्या काळात निवडणुकीसाठी नेमलेल्या २५ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. त्यामध्ये शिक्षकांसह इतर शासकीय विभागांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची यादी तयार असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्या सर्वांना प्रशिक्षणासंदर्भातील माहिती कळविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT