Esakl
Esakl
महाराष्ट्र

MPSC विद्यार्थ्यांच्या वाढीव वयोमर्यादेवरही शासन उदासीन

तात्या लांडगे

कोरोनामुळे सरकारने मेगाभरतीला बगल दिली आहे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षेतून भावी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्याही अडचणी सोडवल्या नाहीत. 'एमपीएससी'च्या परीक्षा, निकाल, नियुक्‍त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे आता ते विद्यार्थी आक्रमक झाले असून रस्त्यांवर उतरून न्याय मागण्याच्या तयारीला लागले आहेत.

सोलापूर : कोरोनामुळे (Corona) स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेतील अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्री, टोल नाक्‍यांवर काम करायला सुरवात केली आहे. संयुक्‍त पूर्व परीक्षा होईना, राज्यसेवेची पूर्व परीक्षा होऊनही मुख्य परीक्षेचे ठरेना, पूर्व व मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखती झाल्या नाहीत. मुलाखतीत उत्तीर्ण होऊनही नियुक्‍त्या मिळालेल्या नाहीत. तर दुसरीकडे मेगाभरतीचाही निर्णय नाही आणि कोरोनामुळे दोन परीक्षांची संधी हुकलेल्यांना वयोमर्यादा वाढवून देण्याचाही निर्णय झालेला नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व त्यांच्याशी संबंधित संघटनांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध मंत्री व बहुतेक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. मात्र, कोणत्याच मागणीवर निर्णय झालेला नाही. त्यामुळे वैतागलेले 20 लाखांहून अधिक उमेदवार आता रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागण्याच्या तयारीला लागले आहेत.(the government did not start mega recruitment because of corona)

'एमपीएससी' महाराष्ट्र राज्य समन्वय समिती, स्टुडंट राईट्‌स संघटना, बेरोजगार व स्पर्धा परीक्षेशी संबंधित संघटनांनी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही ना मेगाभरतीचा ना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निर्णय झाला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सामान्य प्रशासनाकडून राज्यातील विविध शासकीय पदभरतीचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाते. मात्र, 16 महिन्यांपासून अद्याप मागणीपत्र आले नसल्याने पुढील परीक्षांबद्दल विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यातच पूर्व, मुख्य परीक्षा होऊनही मुलाखती झालेल्या नाहीत, काहींची पूर्व परीक्षा झाली असून मुख्य परीक्षा झालेली नाही. तर संयुक्‍त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक अजूनही ठरलेले नाही.

एकीकडे कोरोनामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडीच लाखांहून अधिक पदे रिक्‍त झाली आहेत. तरीही, मेगाभरतीचा निर्णय झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर पूर्व व मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती होत नसल्याने पुण्यातील गंगा नगरातील स्वप्नील लोणकर या तरूणाने 29 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. अनेकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच मिळेल ते काम करायला सुरवात केली आहे. पालकांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी शासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे त्यासंबंधीच्या मागण्या केल्या आहेत, परंतु त्यावर केवळ बघ्याचीच भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या मागण्या

- संयुक्‍त पूर्व परीक्षा कधी होणार; आयोगाने वेळापत्रक जाहीर करावे

- शासनाच्या विविध विभागांमध्ये अडीच लाखांहून अधिक पदे रिक्‍त असून तत्काळ मेगाभरती राबवावी

- एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा, निकाल, मुलाखती, नियुक्‍त्यांवर शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा

- कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा वेळेत होऊ शकल्या नाहीत; उमेदवारांना किमान दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून मिळावी

- शासनाने विविध रिक्‍तपदांचे मागणीपत्र तत्काळ आयोगाला सादर करावे; त्यानंतर आयोगाने नव्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे.

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यांना पुढील परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवून देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निश्‍चितपणे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतील.

- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT