cm maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

Ratnagiri news :आमचे सरकार दारात जाऊन योजना वाटणारे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण आणि नमो ११ सूत्री कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

गेली अनेक वर्षे रखडलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आमचे सरकार आल्यावर वर्षभरातच रत्नागिरीत सुरू झाले, हेच आमचे गतिमान सरकार आहे. कोकणी माणसाला राजकारणापुरते आम्ही वापरून घेणार नाही. लोकांच्या दारात जाऊन योजना वाटणारे आमचे सरकार आहे, घरी बसणारे नव्हे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण आणि नमो ११ सूत्री कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आमच्या सरकारची सर्वसामान्यांशी नाळ जोडलेली आहे. आम्ही फेसबुक लाईव्ह करत नाही. तळागाळातील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन आरोग्य योजनेत आमूलाग्र बदल करणार आहोत.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्ही १६० कोटी खर्च केले. रत्नागिरीत ४३० खाटांचे रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी ५०० कोटी मंजूर केले आहेत.’’या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विनय नातू, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले....

  • कोकण विकासासाठी मुंबई-गोवा-सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता

  • कोकण विकास प्राधिकरण अंतिम टप्प्यात

  • काजू बोर्डाला २०० कोटी

  • आंबा बोर्ड स्थापन करण्याची कार्यवाही सुरू

  • रत्नागिरीतील विमानतळाला

  • ११८ कोटी मंजूर

  • नमो ११ सूत्री कार्यक्रमात

  • अनेकांना मदत करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT