midc news esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्योग विभाग झोपलेला! सोलापुरात उद्योजक यायला तयार, पण मोठे प्लॉट शिल्‍लक नाहीत, 'अतिरिक्त चिंचोली'चा प्रस्ताव धूळखात; आहे त्या प्लॉटसाठी ३०० अर्ज, त्यांनाही जागा मिळेना

उद्योजकांची सर्वाधिक मागणी चिंचोली (ता. मोहोळ) एमआयडीसीतील जागेसाठी आहे. पण तेथे सध्या एक-दोन एकराचेच प्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ‘अतिरिक्त चिंचोली’अंतर्गत १५१ हेक्टरच्या भूसंपादनाचा प्रस्ताव दुरुस्तीसह राज्याच्या उद्योग विभागाकडे पाठविला. आता एक वर्ष होऊनही त्यावर अजूनपर्यंत भूसंपादनाचा निर्णय झालेला नाही, हे विशेष.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उद्योजकांची सर्वाधिक मागणी चिंचोली (ता. मोहोळ) एमआयडीसीतील जागेसाठी आहे. पण तेथे सध्या एक-दोन एकराचेच प्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ‘अतिरिक्त चिंचोली’अंतर्गत १५१ हेक्टरच्या भूसंपादनाचा प्रस्ताव दुरुस्तीसह राज्याच्या उद्योग विभागाकडे पाठविला. आता एक वर्ष होऊनही त्यावर अजूनपर्यंत भूसंपादनाचा निर्णय झालेला नाही, हे विशेष.

महामार्गांची कनेक्टिव्हीटी, गोवा, मुंबईची विमानसेवा, वंदे भारतसह अन्य रेल्वे अशी वाहतुकीची साधने, राहायला पंचतारांकित हॉटेल्स, उद्योगासाठी जागांचे दर अत्यल्प, वीज, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि स्वस्तात मजूर, या बाबींमुळे मोठे उद्योजक सोलापूरमध्ये यायला इच्छुक आहेत. त्यामुळे सध्या चिंचोली एमआयडीसीत शिल्लक असलेल्या १२५ प्लॉटची मागणी उद्योजकांनी केली आहे. ७१ प्लॉटसाठी मोठी स्पर्धा असून त्याठिकाणी अंदाजे ३०० उद्योजकांचे अर्ज आहेत.

काही महिन्यांपूर्वी त्या उद्योजकांना जागा द्यावी, यासाठी त्यांचे अर्ज तथा प्रस्ताव उद्योग विभागाच्या जागा वाटप समितीकडे (लॅण्ड अलॉटमेंट कमिटी) पाठविले. मात्र, त्याठिकाणी देखील निर्णयास विलंब होत आहे. दरम्यान, चिंचोली एमआयडीसीतील एकमेव शिल्लक असलेला १३ एकराचा मोठा प्लॉट प्राची फार्मासिटीकल कंपनीने मागितला आहे. त्याचाही निर्णय प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांत मिळतील उद्योजकांसाठी जागा

चिंचोली एमआयडीसीत सध्या छोटे-मोठे १२५ प्लॉट शिल्लक आहेत. त्यातील ७१ प्लॉटसाठी मागणी अर्ज प्राप्त झाले असून त्यांचे प्रस्ताव जागा वाटप समितीकडे पाठविले आहेत. समितीच्या बैठकीनंतर लवकरच त्या सर्व अर्जदारांना उद्योगासाठी जागा मिळतील.

- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर

चिंचोली एमआयडीसीची सद्य:स्थिती

  • शिल्लक प्लॉट

  • १२५

  • प्लॉट मागणीसाठी अर्ज

  • ३००

  • एकूण प्लॉटची मागणी

  • ७२

  • मोठे प्लॉट मागणारे उद्योजक

  • १० पेक्षा जास्त

...तर बेरोजगारी अन्‌ स्थलांतर कमी होईल

जिल्ह्यातील कासेगाव (पंढरपूर), कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर), येळीव (माळशिरस) या ठिकाणी नव्या औद्योगिक वसाहतीचे (एमआयडीसी) प्रस्ताव आहेत. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा केला, पण त्या ठिकाणच्या ‘एमआयडीसी’ कधीपर्यंत सुरु होईल, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेच नाही. ‘अतिरिक्त चिंचोली’अंतर्गत १५१ हेक्टर जमीन उपलब्ध झाल्यावर त्याठिकाणी १० हजार तरुणांना रोजगार मिळू शकतो. मात्र, त्यावर काहीही निर्णय न झाल्याने अद्याप रोजगार, नोकरीसाठी तरुणांचे स्थलांतर सुरुच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accidental Gunshot Incident : धक्कादायक! शिकारीसाठी बंदूक रोखली झुडूप हालताच गोळी झाडली अन्, पुढे मित्र होता... नेमकं काय घडलं?

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये थंडीचा जोर

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

SCROLL FOR NEXT