Girish Mahajan News esakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan : आतकरवाडीतील स्मशानभुमीचा प्रश्न सोडविण्यात येईल - मंत्री गिरीश महाजन

सकाळ डिजिटल टीम

खडकवासला, ता. ५ : घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण दर्जा, स्मशानभुमीसह‌‌ पायाभूत सुविधांबाबत‌ शुक्रवारी आमदार भीमराव तापकीर विधानसभेत अर्धा तास चर्चा झाली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देताना‌ तातडीने येथील स्मशानभुमीचा प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगितले. तसेच, महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या गावठाण वाढीचे प्रस्तावाचे बाबतीत देखील सरकारचे स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

हवेलीतील भौगोलिकदृष्ट्या मोठी असलेल्या घेरा सिंहगड ग्रामपंचायतचे विभाजनासह स्थानिक गावांचे गावठाण मागणीचे प्रस्ताव, स्मशानभुमीसह इतर प्रश्नांवर चालू पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला. आमदार भिमराव तापकीर यांनी घेरा सिंहगड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी आणि मोरदरवाडी या चार महसूली गावांचे व २१ वाड्या वस्त्या यांचे विविध प्रश्न मांडले.

या विषयासंदर्भात मागील अधिवेशनात शेरा सिंहगड ग्रामपंचायतचे विभाजन व्हावे असा प्रश्न उपस्थित केला होता. भौगोलिक दृष्ट्या मोठी ग्रामपंचायत म्हणजे सुमारे ८५ किलोमीटरचा घेरा आहे. त्याचा परिणाम गावांच्या विकासावर परिणाम होत आहे. तसेच सरकारी कामकाजाचे दृष्टीने असंख्य अडचणी होतात. विकासाचे बाबतीत येथील स्थानिक नागरीकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. या गावांत आजही स्मशानभुमी नसल्याने रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. हे राज्य सरकारचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर घेरा सिंहगड मधील गावांचे गावठाण वाढीचे प्रस्ताव देखील प्रलंबित असुन तातडीने या बाबतीत निर्णय घेण्याची आग्रही मागणी सुद्धा केली. धोरणात्मक निर्णय‌ घ्या. अशी मागणी आमदार भिमराव तापकीर यांनी केली.

तसेच, कोंढणपूर ग्रामपंचायतचे विभाजन करुन अवसरवाडी महसूली गावासाठी देखील स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी असल्याने त्या संदर्भात देखील सभागृहात विषय उपस्थित केला.

घेरा सिंहगडच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेतले जातीलच असे सांगून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने येथील स्मशानभुमीचा प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगून महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या गावठाण वाढीचे प्रस्तावाचे बाबतीत देखील सरकारचे स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT