Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : माझ्यावर आरोप करणारे किर्तनकार हे मोहन भागवतांच्या संप्रदायचे; अंधारे कडाडल्या

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल झाले

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल झालेत. यामुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढत आहेत, मात्र यावरूनच आता अंधारे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर पलटवार केला आहे. व्हायरल क्लिप हे भाजपाचे षडयंत्र आहे. खरा वारकरी असा वाद घालणार नाही. असं काही अमंगल करणार नाही. पंधरा वर्षांनंतर ही क्लिप व्हायरल होत आहे. विरोध करणारे हे किर्तनकार नाहीत, ते पेड किर्तनकार आहेत, प्रहसनकार आहेत. मोहन भागवत यांच्या संप्रदायचे ते किर्तनकार आहेत असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केला आहे. राज्यपाल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी आणि इतर गोष्टींना झाकण्यासाठी देवेंद्रजींचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून माझ्या क्लिपचा वापर केला जात आहे. देवेंद्रजींच्या भाषेत मी जर चार महिन्यांचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

माझ्या क्लिपबाबत चर्चा होते, मात्र सावरकरांनीही तेच लिहून ठेवलं आहे, श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहलंय, मग त्यावर चर्चा का होत नाही. मी शिवसेनेत असल्यामुळे हे सर्व सुरू असल्याचा घणाघाती आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT