Darshana Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Darshana Murder Case: 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते...', संशयास्पद मृत्यू झालेल्या दर्शना पवारचं 'ते' शेवटंच भाषण

संशयास्पद मृत्यू झालेल्या MPSC टॉपर दर्शना पवारचं 'ते' शेवटंच भाषण

अंकिता खाणे (Ankita Khane)

एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचा ट्रेकिंगला गेल्यानंतर राजगडच्या पायथ्याशी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. दर्शना दत्तू पवार, वयाच्या 26 व्या वर्षी एमपीएससी पास झाली होती. वनसेवेच्या परीक्षेत ती राज्यात तिसरी आली होती. पुण्यातून सत्कार स्वीकारून दर्शना राजगडला ट्रेकिंगला गेली आणि तिचेच तिच्या जीवनाचा करुण अंत झाला. तिच्यासोबत तिचा एक मित्र होता, तो मित्र घटना घडल्यापासून गायब असल्याने त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील एका खासगी क्लासमध्ये सत्कार स्वीकारल्यानंतर दर्शनाने त्या ठिकाणी भाषण केलं होतं. त्यामध्ये दर्शनाने यश काय असतं हे अगदी मोजक्याच शब्दात सांगितलं होतं. तीचं हे भाषण सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे.(Latest Marathi News)

प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते... ती स्टोरी ज्यावेळी सक्सेस स्टोरी होते त्यावेळी लोक तुम्हाला ऐकण्यासाठी येतात... हे शब्द दर्शनाच्या शेवटच्या भाषणातले आहेत. पुण्यातील एका खासगी क्लासमध्ये दर्शनाने सत्काराच्या वेळी हे भाषण केलं होतं. हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

दर्शना आपल्या भाषणात काय म्हणाली?

प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते, ही स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच इच्छुक असतात. जेव्हा ती स्टोरी सक्सेस स्टोरी बनून येते. आपण शाळेमध्ये, महाविद्यालयात खूप चांगले गुण मिळवतो, पण आता जे सक्सेस मिळवलंय ते अधिक चांगलं वाटतंय.(Latest Marathi News)

अनेकजण आपल्याला भेटायला त्यांच्या मुलींना घेऊन येतात, अभ्यास कसं करायचं ते विचारतात. जेव्हा आपण अपयशी ठरतो त्यावेळी त्यामागे फक्त आपलाच हात असतो, आपण कुठेतरी कमी पडलो असतो. पण ज्यावेळी यशस्वी होतो ना त्यावेळी खूप लोकांची मेहनत त्यामागे असते.(Latest Marathi News)

मला माझ्या आईवडिलांनी कधीच सांगितलं नाही. की, तू ही गोष्ट करु शकत नाहीस. माझ्या बाबतीत ते नेहमी ओव्हर कॉन्फिडंट असतात. पण मी त्यांना सांगायची की जरासं कंट्रोल करा, ही एमपीएससी आहे. पण तू नक्की पास होणार हे मला त्यांनी सांगितलं. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं, माझ्या यशमागे माझ्या पालकांचा आणि मित्रमैत्रिणींचा हात आहे.

दर्शना पवारच्या मृत्यूचं गूढ आणखी उकलेलं नाही. तिच्यासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: पिकअप व बोलोरोच्या धडकेत एक ठार, 9 गंभीर जखमी; अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील घटना, अंधारात काय घडलं!

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

South Africa vs West Indies: दक्षिण आफ्रिका वेस्ट विंडीज लढत भारतासाठीही महत्त्वाची; उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना

Manjusha Nagpure: पुणे शहरातील स्वच्छतागृहे, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य: महापौर मंजूषा नागपुरे, शंभर दिवसांचे नियोजन करून अंमलबजावणी करणार!

Ear Care Tips : हेडफोन प्रेमींसाठी रेड अलर्ट! तुमचे स्टायलिश इअरबड्स, हेडफोन देऊ शकतात आयुष्यभराची वेदना, त्यामुळं 'ही' 1 चूक करू नका

SCROLL FOR NEXT