Ram Shinde Elected as Legislative Council Speaker Esakal
महाराष्ट्र बातम्या

विधानपरिषद सभापतींनी बैठक घेऊनही ‘प्रश्न जैसे थे’! विद्यापीठाची ५५ कोटींचे प्रशासकीय भवन तयार, अहिल्यादेवींचे स्मारकही अंतिम टप्प्यात, पण जायला रस्ताच नाही

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विद्यापीठाच्या प्रश्नासंदर्भात ८ एप्रिल रोजी बैठक घेतली होती. त्यावेळी प्रा. शिंदे यांनी संबंधित विभागांना आदेश देत तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. साडेतीन महिने झाले, तरीदेखील कोंडी ते नवीन प्रशासकीय भवन या सव्वा किलोमीटर रस्त्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हिरज रोडवरील ४८२ एकर परिसरात ५५ कोटींची प्रशासकीय इमारत बांधून तयार झाली आहे. विद्यापीठासमोर १४ कोटी ८२ लाखांचे अहिल्यादेवींचे स्मारक उभारले जात आहे. याशिवाय २० कोटींचे इनडोअर स्टेडिअम देखील बांधले जात आहे. मात्र, त्याठिकाणी जायला पक्का रस्ताच नाही. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बैठक घेऊनही रस्त्याचा विषय प्रलंबितच आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विद्यापीठाच्या प्रश्नासंदर्भात ८ एप्रिल रोजी बैठक घेतली होती. त्यावेळी प्रा. शिंदे यांनी संबंधित विभागांना आदेश देत तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. साडेतीन महिने झाले, तरीदेखील कोंडी ते नवीन प्रशासकीय भवन या सव्वा किलोमीटर रस्त्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. कोंडीच्या उड्डाणपुलापासून सव्वा किमी रस्ता व्हावा अशी विद्यापीठाची मागणी आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार असून वन खात्याचीही परवानगी आवश्यक आहे. हा रस्ता झाल्यावर विद्यार्थ्यांना थेट नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाता येणार आहे. त्यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विधानपरिषदेच्या सभापतींकडे पाठपुरावा केला. सभापतींनी बैठकही घेतली, पण अजूनही त्यावर मार्ग निघालेला नाही.

जिल्हा नियोजनकडून निधी, पण वर्क ऑर्डर नाही

हिरज रोडवरून विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय भवन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता नाही. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर केला आहे. मात्र, त्याची वर्क ऑर्डर अद्याप निघालेली नाही. त्यामुळे तो रस्ता झाला नसल्याची खंत विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.

विद्यापीठाच्या जमिनीवर टप्प्याटप्प्याने ‘वन’ आरक्षण

नव्या प्रशासकीय भवनाच्या परिसरात स्टेडिअम, वसतीगृहे बांधण्यासाठी सलग जमीन आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाच्या मालकीच्या ४८२ एकर जमिनीपैकी २७२ एकरावर वन विभागाचे आरक्षण आहे. त्यात माळढोक, जंगल आणि इकोसेन्सेटिव्ह झोन, अशा तीन प्रकारचे आरक्षण आहे. सलग जमिनीवर नाही तर तुटक- तुटक (टप्प्याटप्प्याने) ते आरक्षण असल्याने स्वत:च्या मालकीची जागा असून ती वापरता येत नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT